घरताज्या घडामोडीनगरपंचायत निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय भाजपचा होणार, नारायण राणेंचा दावा

नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय भाजपचा होणार, नारायण राणेंचा दावा

Subscribe

मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो आहे. जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा बँकेची निवडणूक या दोन्ही निवडणुका संपल्याशिवाय मी जिल्हाबाहेर जाणार नाहीये. परंतु नगर पंचायतीमध्ये एकतर्फी विजय भाजपाचाच होणार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने या जिल्ह्यात विधायक, सामाजिक, विकासात्मक आणि शैक्षणिक क्षेत्रात कोणतही काम केलेलं नाहीये. तिन्ही पक्षाने फक्त राजकीय टीका करत विकासाला विरोध केलं आहे. तसेच विरोध करून आपली पोळी भाजून घ्यायची. हा एककलमी कार्यक्रम तिन्ही पक्षाने केला आहे. असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हट्लं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्गातल्या चारही शहरांमध्ये निवडणुका आहेत. येथील मतदारांनी १०० टक्के मतदान करावं. कारण आमच्यामागे कार्य आणि सेवाही आहे. विधायक, सामाजिक आणि शैक्षिणिक तसेच धार्मिक सर्वच क्षेत्रात आमचे कार्यकर्ते आणि पक्ष काम करत आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेसाठी मतदान करणारे आमचे मतदार सूज्ञ

जिल्हा बँकेचे आताचे अध्यक्ष यांच्यावरती संचयतीवरती केस सुरू आहे. संचयतीमध्ये जी अफरातफर केली आणि हे तुरूंगात होते. त्यांच्यावर आरोप करण्यात आले असून चौकशीबाबात निकाल अद्यापही समोर आलेला नाहीये. त्यामुळे अफरातफर करणारा आमच्या समोरच्या पॅनेलचा व्यक्ती असल्यामुळे जिल्हा बँकेसाठी मतदान करणारे आमचे मतदार सूज्ञ आहेत. तीन पक्षाचं पॅनेल आणि सरकार असल्यामुळे राज्यात त्यांच्या मंत्र्यांनी केलेली अफरातफर भ्रष्टाचार त्यांसंदर्भातील अनेक गुन्हे बाहेर येत आहेत.

मी या जिल्ह्यात विकासाची कामं सुरू करणार आहे. तसेच येणाऱ्या ३० जानेवारीपर्यंत त्याला सुरूवात होणार आहे. योजनादेखील लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून येत्या २१ ते २३ तारखेपर्यंत एमएससीबीचे सर्व अधिकारी दिल्लीवरून सिंधुदुर्गात जिल्ह्यात येऊन विविध योजनांचा लाभ सुरू करतील असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ऑनलाईन क्लासदरम्यान धक्कादायक प्रकार, मोबाईलच्या स्फोटात विद्यार्थी गंभीर जखमी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -