घरताज्या घडामोडीऑनलाईन क्लासदरम्यान धक्कादायक प्रकार, मोबाईलच्या स्फोटात विद्यार्थी गंभीर जखमी

ऑनलाईन क्लासदरम्यान धक्कादायक प्रकार, मोबाईलच्या स्फोटात विद्यार्थी गंभीर जखमी

Subscribe

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि कॉलजेचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. सध्या विद्यार्थ्यी घरात बसून मोबाईल आणि कॉम्प्यूटर यांसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. परंतु काही ठिकाणी दिवसभर ऑनलाईन क्लास घेतले जातात. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांसह मोबाईलवर देखील होतो. मात्र, ऑनलाईन क्लासदरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तो म्हणजे मोबाईलच्या स्फोटात आठवीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना मध्य प्रदेशातील सतना येथे घडली आहे. ऑनलाईन क्लास सुरू असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. त्यामुळे या घटनेत आठवीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्टोफामुळे विद्यार्थी जखमी झाला असून त्याचा चेहरा आणि हात गंभीररित्या भाजला आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितलं जातं आहे.

- Advertisement -

या विद्यार्थ्यांचे नाव रामप्रकाश भदौरिया असं आहे. तसेच त्याचे वय १५ वर्ष आहे. तो सतना येथील चांदकुईया गावातील एका खासगी शाळेत शिकतो. शाळा बंद असल्यामुळे तो घरातून ऑनलाईन क्लास अटेंड करत होता. मात्र, अचानक क्लासदरम्यान मोबाईलचा मोठा स्फोट झाला. त्यावेळी विद्यार्थ्याच्या हाताला आणि चेहऱ्यावर गंभीररित्या दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर त्याला लगेच स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या तोंडाला आणि नाकाला पूर्णपणे मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची चौकशी केली असता, विद्यार्थी घरात अभ्यास करत होता. मात्र, त्याचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ही घटना घडली त्यावेळी त्याच्या पालकांनाही कल्पना नव्हती. परंतु पोलिसांनी या घटनेची माहिती त्याच्या पालकांना दिली. त्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला. परंतु पुढील उपचारांसाठी रामप्रकाशला जबलपूरच्या रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पुढील चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

मोबाईलचा स्फोट होणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. मात्र, मोबाईलची बॅटरी ओव्हरचार्ज झाली असता किंवा मोबाईल फोन गरम झाला असता त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घ्यावी, अशी सूचना वारंवार केली जाते.


हेही वाचा : Virat Kohli vs BCCI: विराट कोहलीच्या ‘त्या’ वक्तव्यावर BCCIची बोलती बंद, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -