पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माचा पताका उंचवणारे महाद्वार ठरतील, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

narendra modi speech in pandharpur palkhi marg function stone lay foundation

पंढरपूर पालखी मार्गाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्येही भाषण केलं आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणारे मार्ग हे भागवत धर्माचा पताका उंचवणारे महाद्वार ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दोन दिवसांपुर्वी केदारनाथमध्ये शंकराचार्यांची पूजा केल्यानंतर आता विठ्ठलाने तुमच्यासोबत मला जोडलं आहे. तसेच पंढरपूरशी माझे फार जवळचे संबंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंढरपूरची अनुभूती अलौकीक आहे. वारीमध्ये स्त्रीशक्तीचा मोठा सहभाग असतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यानंतर मोदी विठ्ठलाने तुमच्यासोबत मला जोडलं यापेक्षा जास्त आनंद कशात असू शकतो असे म्हणाले. पंढरपूरला आनंदाचे स्वरुप असून आज सेवेचा आनंद आहे. मला अतिशय आनंद होत आह की, संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे उद्घाटन होत आहे. रस्ते हे विकासाचे द्वार असतात. तसेच पंढरपूरच्या दिशेने जाणारे हे मार्ग भागवत धर्माचा पताका आणि उंच फडकणारे महाद्वार ठरतील. पंढरपूरसारख्या मार्गाकडे जाणारे हे द्वार महाद्वार ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंढरपूर पालखी मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले. हे काम ३ टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. पहिल्या टप्यात ३५० किमी हायवे करण्यात येणार असून यासाठी ११ हजार करोड रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या दोन्ही हायवेच्या बाजूला पालखी यात्रेसाठी पायी चालण्यासाठी विशेष मार्ग बनवण्यात येणार आहेत. पंढरपूरला जोडणारे सव्वा दोनशे किलोमीटर हायवेचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले आहे. बाराशे करोड खर्च करण्यात आले आहे. हे मार्ग पंढरपूरला जाण्यासाठी मदत करतील. महामार्ग या क्षेत्राचा विकास करणारे माध्यम बनतील. यासोबत दक्षिण भारताची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली झाली आहे. यामुळे पंढरपूरला अनेक भक्त येतील असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यापुर्वी आपल्या भारतामध्ये अनेक हल्ले झाले आहेत. शेकडो वर्षांच्या गुलामीमध्ये देश जखडला गेला. नैसर्गिक आपत्ती आली. अनेक कठीण प्रसंग आले. परंतु विठ्ठलाची वारी अखंडीत सुरु राहिली. आषाढी यात्रेला पंढरपूरचे विहंगम दृष्य पाहायला मिळते. दिंडीमध्ये भेदभाव नाही होत. प्रत्येक वारकरी समान आहे. प्रत्येक वारकरी एकमेकांचा गुरुभाव आहे. फक्त एकच विठ्ठलाचे भक्त म्हणून असतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये सांगितले आहे.

पंतप्रधान यांचा पंढरपूरशी संबंध

माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी असे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा पंढरपूरशी विशेष संबंध असल्याचे सांगितले आहे. तो म्हणजे गुजरातमधील द्वारका इथे येऊन मिळते तर मी काशीचा आहे आणि पंढरपूरला दक्षिणेचे काशी म्हणतात. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ यांना भूमीने युगसंगत बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या स्थानिकांकडे ३ मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालखी मार्गावर वसलेल्या गावांतील लोकांकडून आणि महाराष्ट्रातील नागरिक, वारकऱ्यांकडून ३ गोष्टींची मागणी केली आहे. त्यातील पहिली म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दोन्ही बाजूला झाडे लावली पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे खासकरुन मार्गांवर वसलेल्या गावांनी नेतृत्व केलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी दुसरी मागणी अशी केली आहे की, पालखी मार्गांवर काही मीटरच्या अंतरावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी प्याऊ बनवण्यात यावेत. याचा वारकऱ्यांना मोठा उपयोग होईल. तर तिसरी मागणी अशी आहे की, भविष्यात पंढरपूर भारतातील सर्वाधिक स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे. जगभरातील लोकं पंढरपूरला आली पाहिजेत. जेव्हा स्थानिल लोकं पुढाकार घेतील तेव्हा हे शक्य होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


हेही वाचा : वारकऱ्यांच्या मार्गावर गवताच्या टाईल्स, मुक्काम तळ, १२ हजार कोंटी रस्त्याच्या कामांचे पंतप्रधानांकडून लोकार्पण