घरमहाराष्ट्रनाशिकNarendra Modi यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहीम; देशवासीयांनाही केले आवाहन

Narendra Modi यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहीम; देशवासीयांनाही केले आवाहन

Subscribe

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला नाशिकमधून सुरुवात झाली असून रोड शो झाल्यानंतर ते नाशिकच्या रामकुंड येथे दाखल झाले. याठिकाणी त्यांनी जलपूजन केले आणि साधु-संतांची भेट घेतली. विशेष म्हणजे गोदावरीचे जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यानंतर त्यांनी  नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात स्वच्छता मोहीमही राबवली आणि त्यानंतर पूजा व महाआरती केली. नरेंद्र मोदी यांचा हातात झाडू घेऊन स्वच्छता करतानाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतोना दिसत आहे. (Narendra Modi cleanliness drive at Kalaram temple in Nashik Countrymen were also appealed to)

हेही वाचा – ‘गेमचेंजर’ प्रकल्प’ : Atal Bihari Vajpayee शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

- Advertisement -

नाशिकमधील तपोवन मैदानात राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले. यानंतर त्यांनी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आजचा काळ हा तरुणाईसाठी अमृतकाळ असल्याचे म्हटले. तसेच तरुणांना आवाहन करताना म्हटले की, नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केले होते आपण सर्व 22 जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचे सौभाग्य मिळाले. यावेळी देशवासियांना आग्रह करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा.

हेही वाचा – Narendra Modi काळाराम मंदिरात आल्याचा आनंद, पण…; कांदाप्रश्नी संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

- Advertisement -

काळाराम मंदिरात मोदींकडून रामरक्षा पठण

दरम्यान, काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य दरवाजाने प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्थांनी त्यांचे येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन स्वागत केले. मोदींनी हनुमानाचे दर्शन घेतले. हे दर्शन घेऊन ते प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात दाखल झाले. यावेळी मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. मोदींनी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प केला. तसेच, काळाराम मंदिरात रामरक्षा पठण देखील केले. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी मोदींकडून विधिवत पूजा करवून घेतली. ही पूजा पार पडल्यानंतर मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -