Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक महापालिका आयुक्तांना बदलीची भीती; वास्तुदोषाच्या धसक्याने स्थलांतर?

नाशिक महापालिका आयुक्तांना बदलीची भीती; वास्तुदोषाच्या धसक्याने स्थलांतर?

Subscribe

नाशिक : महापालिका आयुक्तपदी आलेल्या अधिकार्‍यांची कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उचलबांगडी होते आणि त्यामागे शासकीय निवासस्थानातील वास्तुदोष कारणीभूत असल्याचा अंदाज बांधत आयुक्त डॉ. अशोक करंजकर बंगला सोडून दुसर्‍या ठिकाणी राहायला जात असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, आयुक्तांच्या अशा भूमिकेमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचे सांगत अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी या प्रकाराचा निषेध केला. दरम्यान, बंगल्यातील डागडुजीचे काम सुरू असल्याने आयुक्त तात्पुरत्या स्वरुपात घर बदलत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिका आयुक्तपदी मार्च २०२२ मध्ये दाखल झालेले रमेश पवार यांची अवघ्या चारच महिन्यांत बदली झाली होती. त्यांच्या जागेवर आलेल्या डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, डॉ. पुलकुंडवार यांचीही बदली एक वर्ष होण्यापूर्वीच झाली होती. त्यानंतर तीन महिने हे पद रिक्तच होते. अखेर जुलै २०२३ मध्ये या पदावर डॉ. अशोक करंजकर यांची बदली झाली.

- Advertisement -

महसूलसह महापालिका अधिकार्‍यांनी स्वतःच्या बसण्याच्या जागेची दिशा बदलणे, फर्निचरमध्ये बदल करणे, केबिनमधील फ्रेम्स किंवा मूर्तींना बाहेरचा रस्ता दाखवून वास्तुशास्त्र किंवा फेंगशुईप्रमाणे उपाययोजना करणे, केबिन किंवा घरांचा रंग बदलणे, घरांच्या नूतनीकरणावर जनतेचा पैसा वारेमाप खर्च करणे असे उद्योग नाशिककरांना नवे नाहीत.

आयुक्तदर्जाचा व्यक्ती अशा पद्धतीने वागू लागल्यास अंधश्रद्धा वाढीस लागते. हे प्रकार चुकीचे आहेत. स्वतःच्या कामांसाठी जनतेचा पैसा खर्च करणे योग्य नाही. : कृष्णा चांदगुडे, राज्य समन्वयक, अंनिस

पालिकेतील शापित केबिन

महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनातील अनेक केबिन्स अशाच अंधश्रद्धेपोटी ओस पडल्या आहेत. अनेक अधिकार्‍यांनी तर मुख्यालयातील केबिन्समध्येदेखील बदल केले आहेत. तात्कालीन आयुक्त विलास ठाकूर यांनी तर बंगल्यात गाय बांधली होती. अधिकार्‍यांच्या अशा अंधश्रद्धेमुळे नाशिककरांचा कररुपी पैशांची उधळपट्टी सुरू आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -