घरताज्या घडामोडीNashik Oxygen Tank Gas leakage: नाशिक दुर्घटनेची होणार सात सदस्यीय चौकशी, सदस्यांची...

Nashik Oxygen Tank Gas leakage: नाशिक दुर्घटनेची होणार सात सदस्यीय चौकशी, सदस्यांची नावे आरोग्यमंत्र्यांकडून जाहीर

Subscribe

दुर्घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार

विभागीय आयुक्त, कलेक्टर ऑफिस, आपत्ती व्यवस्थापन या सगळ्या व्यवस्थेने यामध्ये लक्ष घातले आणि ऑक्सिजन लिकेज थांबवले, त्यानंतर ऑक्सिजन टाकी पुन्हा भरल्यामुळे पुन्हा सगळे सुरळीत झाले. परंतु ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे जी दुःखद, दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे अध्यक्ष असतील, उपसंचालक आरोग्य डॉ. पु. ना. गांडाळ हे सदस्य असतील. तर जे आयसीयू बघतात वैद्यकीय अधिकारी आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे प्रमोद गुंजाळ हे देखील सदस्य असतील तसेच मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ५ लाख आणि नाशिक महानगरपालिकेकडून ५ लाख असे १० लाखांची मदत जाहीर करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

नाशिक दुर्घटनेसाठी ७ सदस्यांची उच्चस्तरीय समिती

नाशिक महापालिका झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गॅस दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी ७ सदस्यांची निर्मिती करण्यासाठी नेमण्यात आली आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे अध्यक्ष असतील, उपसंचालक आरोग्य डॉ. पु. ना. गांडाळ हे सदस्य असतील. तर जे आयसीयू बघतात वैद्यकीय अधिकारी आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे प्रमोद गुंजाळ हे देखील सदस्य असतील, तसेच ही तांत्रिक बाब आहे त्यामुळे प्राचार्य तंत्रनिकेतन ज्ञानदेव नाठे हे सदस्य असतील महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे हे महानगरपालिकेतील पाईप लाईनचे काम बघतात ते देखील सदस्य असतील, ऑक्सिजन फुड आणि ड्रग्जमध्ये ऑक्सिजन येतो त्यामुळे श्रीमती माधुरी पवार सहाय्यक संचालक यासुद्धा सदस्य असतील, ज्यांनी अनेक अशाप्रकारचे ऑक्सिजन प्लांट बसवले असतील त्यातील तज्ञ हर्षल पाटील हे देखील सदस्य असतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रमुख डॉक्टर,विभागीय आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन टाकीमध्ये लिकेज झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात ऑक्सिजनचा पांढरा धूर पसरला होता. परंतु काही दिसत नव्हते परंतु जीवावर उधार होऊन सगळेजण त्यात गेले आणि वॉल्व लॉक होता. तो लॉक असलेला वॉल्व उघडून त्या टाकीतील २५ टक्के लिक्वीड ऑक्सिजन थांबवले. त्यानंतर त्या लॉकचे वेल्डिंग करुन ब्रेझिंग करुन पाऊणतासानंतर सर्व सुरळित झाले होते. टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्यात आले आणि रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळित चालू केली परंतु यामध्ये २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सगळ्याच्या संदर्भात असे मत आहे की, तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे या जागी सीसीटीव्ह लावण्यात येतात, तसेच टाकीमध्ये किती ऑक्सिज आहे. प्रेशर किती आहे या दोन्ही गोष्टी कळू शकतात त्यासाठी मीटर असतात. ते क्लाऊड सिस्टम किंवा चीपद्वारे कुठूनही त्याला हाताळता येऊ शकते. तसेच एखादा माणूस सिक्युरिटी माणुस नेमण्याची गरज आहे. सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी एखादा तज्ञ व्यक्ती नेमायला हवा तसेच अशी घटना पुन्हा घडू नये त्यासाठी काय करायला पाहिजे याबाबत समिती सुचवेल आणि मार्गदर्शक सूचना तयार करुन घेण्यात येतील.

- Advertisement -

दुर्घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५ लाख आणि महापालिकेने ५ लाख अशा १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -