Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र नाशिकचा टक्का घसरला! बारावी निकालात नाशिक विभाग सहाव्या स्थानावर

नाशिकचा टक्का घसरला! बारावी निकालात नाशिक विभाग सहाव्या स्थानावर

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी (दि.8) जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात राज्यासह नाशिक विभागात मुलींनी बाजी मारली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या नियमित शाखांसह व्होकेशनल व व्यावसायिक शाखांमध्येही मुलांपेक्षा मुलीच अधिक सरस असल्याचे निकालाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नाशिक विभागाचा एकूण निकाल 94.35 टक्के जाहीर झाला.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्यातील 9 विभागांमध्ये नाशिक विभाग सहाव्या स्थानावर फेकला गेला. तर विभागातील चार जिल्ह्यांमध्ये नाशिक 92.65 टक्के निकालासह चौथ्या स्थानावर घसरला आहे. विभागातील एक लाख 64 हजार 962 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी एक लाख 64 हजार 29 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी एक लाख 54 हजार 764 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित विद्यार्थ्यांचे प्रमाण 95.3 टक्के आहे.

जिल्हानिहाय निकाल

  • नाशिक : 90.13टक्के
  • धुळे : 92.29 टक्के
  • जळगाव : 93.26 टक्के
  • नंदुरबार : 93.03 टक्के
  • एकूण : 91.66 टक्के
पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
- Advertisement -

अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी बोर्डातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा जुलै-ऑगस्ट 2022 या महिन्यात होणार आहे. श्रेणीसुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील.

चार विद्यार्थ्यांचा निकाल रोखला

विभागात परीक्षेदरम्यान तब्बल 60 विद्यार्थ्यांना गैरमार्गाचा अवलंब करताना पकडले गेले. त्यापैकी 37 विद्यार्थ्यांना त्या विषयात अनुत्तीर्ण केले. तर एका विद्यार्थ्यांस पुरवणी परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली. चार विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला. बनावट हॉलतिकिट तयार करुन परीक्षेस प्रविष्ठ होत असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती 19 विद्यार्थी निर्दोष आढळले. त्यांचा निकालही जाहीर करण्यात आला.

शुक्रवारपासून गुणपडताळणी 
- Advertisement -

परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायची असेल त्यांना 10 ते 20 जून 2022 या कालावधीत अर्ज करता येणार आहे. छायाप्रतीसाठी 10 ते 29 जून 2022 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज बोर्डाकडे सादर करता येईल.

- Advertisment -