घरमहाराष्ट्रनाशिकआयएमएच्या संपात ३ हजार डॉक्टर सहभागी; रुग्णसेवा प्रभावित

आयएमएच्या संपात ३ हजार डॉक्टर सहभागी; रुग्णसेवा प्रभावित

Subscribe

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात ‘आयएमए’चा देशव्यापी संप, शहरासह जिल्ह्यातील दीड हजार डॉक्टरांचा सहभाग, आरोग्यसेवा प्रभावित

कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र कायदा करावा, या मागणीसाठी ‘आयएमए’ने पुकारलेल्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शहरासह ग्रामीण भागातील संघटनेचे ३ हजार डॉक्टर सहभागी झाल्याने, आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती.शहरातील सुमारे ५०० रुग्णालयांमधील १ हजार ५५० डॉक्टर या संपात सहभागी झाले होते. तर, देवळा, सटाणा, मालेगावसह अन्य सर्वच तालुक्यांमधील आयएमएच्या दीड हजार डॉक्टरांनी या संपाला पाठिंबा देत आपली सेवा बंद ठेवली होती. मात्र, त्यातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला. डॉक्टरांच्या संपाला सामाजिक संस्थांचाही पाठिंबा लाभल्याने, काही भागांत निदर्शनेही केली गेली. दरम्यान, या संपाबाबत अनभिज्ञ असलेल्या आणि ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisement -

या संघटनांचा लाभला पाठिंबा

‘आयएमए’ संघटनेने पुकारलेल्या बंदला निमा (महाराष्ट्र), होमिओपॅथी व एम.आर., याशिवाय निमा, रोटरी, नाशिक रनर्स, होप फाउंडेशन या सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दिला.

या सेवा ठेवल्या बंद

बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), सोनोग्राफी, लॅब बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, अत्यावश्यक नसलेल्या काही शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलण्यात आल्या. सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत हा बंद पाळण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -