घरमहाराष्ट्रनाशिकतुकाराम मुंडेंनी आरोग्य विभागाची मागवली माहिती

तुकाराम मुंडेंनी आरोग्य विभागाची मागवली माहिती

Subscribe

आरोग्य सेवा विभागात आयुक्तपदी बदली होताच त्यांनी मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती मागवली आहे.

नाशिक :  कायमस्वरुपी चर्चेत राहिलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांची आरोग्य सेवा विभागात आयुक्तपदी बदली होताच त्यांनी मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती मागवली आहे.

 गेल्या आठवड्यात 44 आयएएस अधिकार्‍यांच्या बदलीत मुंडे यांच्याकडे आरोग्य विभागाची धुरा सोपविली आहे. मुंडे यांनी आपला मोर्चा मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचारी, अधिकारी वर्गाकडे वळविला आहे. आयुक्त मुंडे यांनी आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यांशी संवाद साधत, मुख्यालयी राहणारे तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचा अहवाल मागविला आहे.

- Advertisement -

 या अहवाला मागविल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रत्येक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -