घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसटाणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागतिक पातळीवर झेंडा

सटाणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागतिक पातळीवर झेंडा

Subscribe

नाशिक : ’मविप्र’च्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हणजेच सटाणा महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागाच्या तब्बल १२ विद्यार्थ्यानी ’रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) अँड डेटा सायन्स (डीएस)’ या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातून जागतिक पातळीवर सहभागात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त सटाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भरीव सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या बीबीए विभागाची एक विद्यार्थिनीदेखील यात सहभागी झाली होती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही सध्या जगातील प्रथम क्रमांकाची टेक्नॉलॉजी असून यात सर्वाधिक नोकर्‍या उपलब्ध असून, जगभर याक्षेत्रात काम करणार्‍या लोकांचा अक्षरश: दुष्काळ आहे. मविप्रच्या सटाणा महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागात विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), इंटरनेट ऑफ थिंग्ज (वस्तुमात्रांचा परस्पर संवाद), डेटा सायन्स (माहितीसाठा विज्ञान) इ. अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर प्राध्यापक व विद्यार्थी संशोधन करीत असून नवीन प्रणाली विकसित करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी प्रोजेक्ट आराखडादेखील बनविला आहे.

सटाणा महाविद्यालयात कॉम्पुटर्ससह अद्ययावत उपकरणे, किटस् व संशोधनासाठी साधनसामुग्री उपलब्ध असून एकट्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास २१ रिसर्च पेपर तसेच हवामान, शेती तंत्रज्ञान संदर्भातील सहा वैयक्तिक पेटंट प्रकाशित असून यापैकी एक पेटंट भारत सरकारने अधिकृत पणे ग्रांट (बहाल) केले आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स विभागा प्रमाणेच रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इतिहास आदी विदयालयातील इतर प्रत्येक विभागदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले संशोधन सादर करण्यासाठी झटत आहे, अशी माहिती सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड यांनी दिली. अकल्पनीय नव्हे तर सत्यात ओपन एआय, टेस्ला मोटर्स, स्पेस एक्स आणि सोलर सिटी आदी कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी एलन मस्क यांच्याशीदेखील महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने वैयक्तिक संपर्क साधला असून, ’मविप्र’च्या विद्यार्थांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यात केवळ नोकरी नव्हे तर भागीदारी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही प्राचार्य डॉ गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, जागतिक पातळीवर ’स्कोप ऑफ एआय, आयओटी, डीएस अ‍ॅड अ‍ॅग्रीकल्चर इकॉनॉमिक ग्रोथ विथ न्यू एज्युकेशन पॉलिसी’ या विषयावर आपले संशोधन व्याख्यान देण्याची संधी मविप्रच्या प्रा. किरणकुमार जोहरे यांनाही मिळाली.

- Advertisement -
आंतरराष्ट्रीय परीषदेत सहभागी विद्यार्थी

१. ढोबळे राज दीपक २. पवार तेजस्विनी साहेबराव ३. शेवाळे गायत्री संजय ४. पाठक अनिकेत शांतिलाल ५. बागूल रोहिणी रवींद्र ६. दळवी वैष्णवी प्रवीण ७. खैरनार मंजूषा बाळासाहेब ८. मोरे सायली आप्पा ९. मोरे चारुशिला भाऊसाहेब १०. पवार मालती विलास ११. प्रजापती साक्षी राजेंद्र १२. शेख अदनान अकबर १३. आहिरे निलक्षा (बीबीए)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -