घरताज्या घडामोडीनाशिकरोडला विजेच्या धक्क्याने १० वर्षीय लहानगीचा मृत्यू

नाशिकरोडला विजेच्या धक्क्याने १० वर्षीय लहानगीचा मृत्यू

Subscribe

बॅडमिंटन खेळताना अडकलेले फूल काढण्याच्या प्रयत्नात लागला शॉक

नाशिकरोड भागातील सुंदर नगर येथे राहणारी सोनाली दिनकर निकुंभ (वय १०) या लहानगीचा आज विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बॅडमिंटन खेळत असताना वायरला अडकलेले फुल काढताना तिला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बॅडमिंटन खेळत असताना बॅडमिंटनचे फुल खांबावरील वायरला अडकले. हे फुल काढण्यासाठी तिने लोखंडी पाईप घेतला. याच प्रयत्नात तिला जोरदार विजेचा धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नागरिकांसह तिच्या कुटुंबियांनी तातडीने धाव घेत तिला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केलीय. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे निकुंभ कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -