घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये १७ संशयित कोरोनारुग्ण; 32 रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित

नाशिकमध्ये १७ संशयित कोरोनारुग्ण; 32 रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित

Subscribe

जिल्हयात कोरोना संशयित रुग्णाच्या संख्येत शनिवारी (दि.४) वाढ झाली असून नव्याने कोरोना संशयित 1७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, मालेगाव रुग्णालय आणि महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या युवकाची प्रकृती स्थिर आहे. २ ते ४ एप्रिल दाखल झालेल्या ४० रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित असून त्यांचा अहवाल रात्री उशिरा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात १, तर मालेगाव सामान्य रुग्णालयात १, नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात १५ असे 1७ नवीन कोरोना संशयित रुग्ण शनिवारी (दि. ४) दाखल झाले आहेत. धुळे शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले 32 कोरोना संशयितांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत 820 नागरिक परदेशातून आलेले आहेत, यापैकी 433 नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेले आहे. उर्वरित 387 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी सुरू आहे.

- Advertisement -

रुग्णालयातून युवकाचे पलायन

जिल्हा रुग्णालयातून १९ वर्षीय युवकाने पलायन केले आहे. तो येवला येथून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तो पळून गेल्याने जिल्हा रुग्णालया प्रशासन, सुरक्षारक्षकांची पळापळा झाली.

नाशिक करोना अहवाल

निगराणीखाली असलेले रुग्ण 820
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 42
तपासणी केलेले नमुने 194
निगेटिव्ह रिपोर्ट 161
पॉझिटिव्ह रिपोर्ट 01
प्रलंबित रिपोर्ट 32
शनिवारी दाखल झालेले रुग्ण 1७
जिल्हा रुग्णालय 0१
सामान्य रुग्णालय मालेगाव 0१
डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय १५

- Advertisement -

कोरोनाबाधित देशातून दौरा करुन आलेले नागरिक

यु ए ई ०४
सौदी ०३
इतर १०
एकूण १७

एक प्रतिक्रिया

  1. देशभरात लॉक डाऊन ची गरज भासत असल्यामुळे घराच्या बाहेर कोणालाही येता येत नाही व त्याचे पडसाद, समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या संस्थावर होत आहे, उदाहरण अर्थ मागील कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही जातीपातीचा उल्लेख न करता मानवसेवा हीच जात आणि धर्म या उक्तीप्रमाणे प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकीची मनाशी केलेली संगत म्हणूनच हा वटवृक्ष आज उदयास आला, चांगले-वाईट अनुभव उराशी बाळगून हे कार्य सिद्धीस नेण्याचा एक प्रयत्न संस्थेने आज गरजूंना मदतीचा हात देऊन आयुष्याच्या सुखमय प्रवासाचे जणू वचन दिले मानवाच्या जीवनाच्या उत्तरार्धात येणाऱ्या समस्यांना संस्थेने एक सुखी समाधानाचे लोपण लावले आहे. संस्थेने गरजूंना लागणाऱ्या सर्व सुखसोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी तन मन धनाने प्रयत्न चालू केलेले आहे आज पर्यंत शेकडो वयोवृद्धांनी संस्थेचा लाभ घेतलेला आहे. या संस्थेने आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणाही गरजवंताला हात देण्याचा आणि समाजामध्ये आनंद नांदावा यासाठी चा हा एक छोटासा प्रयत्न म्हणजे मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम, हे गेली कित्येक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक आणि अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्धांसाठी व तसेच अंध, अपंग, गतिमंद, मनोरुग्ण, आणि निराधार असलेल्या व्यक्ती व लहान मुले, मुलीं यांचे शिक्षण व सर्व सुखसोयी साठी अहोरात्र काम करत आहे, ही संस्था समाजातील काही दानशूरांच्या दानवर चालत आहे पण आर्थिक मंदी आणि दानशूर हे संस्थे पर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे आज या संस्थेवर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे, आज ह्या सेवाभावी संस्थेत जवजवळ १०० व्यक्ती सेवा सुश्रुषाने समाधान कारक आहेत. लॉक डाऊन ची समस्या वाढतच गेली तर नक्कीच उपासमारीची वेळ येण्याची शक्यता दिसत आहे कारण की, शासनाने आज पर्यंत आमच्या संस्थेला कुठलाही प्रकारचा मदतीचा हात अजून तर देण्याचा प्रयत्न केले ला नाही. त्यासाठी समाजातील दानशूरांना आमच्या संस्थेने आव्हान केले आहे की,अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला धान्य स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदतीचा हात देऊन सहकार्य करून आपण पुण्य संपादन करावे . मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
    मदतीचा हात देण्यासाठी .. संपर्क किंवा आर्थिक सहाय्यासाठी मदत यावर करा.
    आवश्यक असलेल्या किराणामाल …
    आवश्यक असलेल्या मेडिकल गरजा…
    आपण आर्थिक स्वरूपातही संस्थेला मदत करू शकतात या खात्यावर.
    प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन.
    बँक. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंबड शाखा.
    IFSC.code.cbino283685
    खाते क्रमांक.3790081590
    मानवसेवा केअर सेंटर.
    बँक. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंबड शाखा.
    खाते क्रमांक. ३५२४५१७२०६
    मोबाईल पे.९५१८७०५६२७.
    आपली मदत आमच्यासाठी अनमोल आहे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -