घरमहाराष्ट्रनाशिकपिकअप, मोटरसायकल धडकेत २ ठार

पिकअप, मोटरसायकल धडकेत २ ठार

Subscribe

कळवण रस्त्यावरील बोरीचापाड्या नजीकची घटना

वणी : कळवण रस्त्यावरील बोरीचापाड्या नजीक भरधाव पिकअपने मोटरसायकला दिलेल्या धडकेत भातोडे येथील दोन तरुन ठार झाले. वणी शिवारातील बोरीचापाडा येथील बालाजी नर्सरीसमोर शुक्रवारी (दि. १८) रात्री ८ वाजेच्या दरम्यान नांदुरी बाजूकडून टोमॅटो भरुन वणीकडे भरधाव वेगाने येणारी पिकअपने (एमएच १७-बीडी ५८१८) वणी बाजूकडून चंडीकापूरच्या दिशेने जाणार्‍या मोटरसायकला जोरदार धडक दिली.

यात मोटरसायकलस्वार सागर धनराज बागूल (वय २२) व राहूल नामदेव चहाळे (वय १८) हे दोघे रा. भातोडे, ता. दिंडोरी हे जागीच ठार झाले. पिकअपची धडक इतकी भयावह होती की, मोटरसायकल व दोघाही तरुणांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. धडक दिल्यानंतर पिकअपही रस्त्याच्या मधोमध पलटी होवून पिकअपमधील टॉमेटो रस्त्यावर सर्वत्र पसरुन टोमॅटोचा रस्त्यावर चिखल झाला होता.

- Advertisement -

घटनेनंतर स्थानिक व पोलिसांनी धाव घेत छिन्नविच्छन्न मृतदेह येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. घटनेची खबर भातोडे येथे कळताच ग्रामस्थांनी ग्रामिण रुग्णालयात धाव घेत पिकअप चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी व वणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांची समज काढून वातावरण शांत केले. दरम्यान, रात्री उशिरा पिकअप चालकावर वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयत तरुण दोघेही शेतमजूर व घरातील कर्ते होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -