घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र२२ कोटींचा अपहार; गोल्डमॅन पंकज पारखला अटक

२२ कोटींचा अपहार; गोल्डमॅन पंकज पारखला अटक

Subscribe

येवला : येथील सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तथा चेअरमन, येवला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांना २२ कोटींच्या अपहारप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून नाशिक शहरातून अटक केली. निफाड विशेष न्यायालयाने त्याला शुक्रवारी (दि.३) आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पंकज पारख हे सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून, सुभाषचंद्रजी पारख पतसंस्थेचे संस्थापकही आहेत. ते काही वर्षांपूर्वी त्यांच्या सोन्याच्या शटर्र्ने त्यांना गिनीज बूकमध्ये स्थान मिळवून दिले होते. त्यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त सुमारे चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घातला होता. त्याची १ ऑगस्ट २०१४ रोजी अंदाजे ९८ लाख ३५ हजार ९९ रुपये किंमत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन व संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार २१ कोटी ९६ लाख ९९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संशयित पंकज पारख हे नाशिक शहरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने संशयित पारख यांचा माग काढत त्यांना अटक केली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने संशयित पारख यांच्यासह इतर संचालकांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद एकून घेत 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरिक्षक अशोक मेश्राम अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सोनेतारण न ठेवता कर्ज

संशयित पंकज पारख यांनी सुभाषचंद्र पारख नावाने पतसंस्था स्थापन केली आहे. सहायक निबंधकांनी या पंतसंस्थेच्या ताळेबंदचा आढावा घेतला लेखापरीक्षणामध्ये ही पतसंस्था तोट्यात असल्याचे निदर्शनास आले होते. पतसंस्थेच्या ठेवी पतसंस्थेत जमा न करता 90 ते 100 कर्जदारांना मुदत पावती नसतानाव कर्जाची मागणी अर्ज नसतांना मुदत पावतीवर कर्ज वाटप केल्याचे लेखापरिक्षणात समोर आले. अनियमित कर्ज वाटप केल्यानंतर वसुली केली नाही. सोने तारण न ठेवता कागदोपत्री कर्ज दिल्याचे समोर आले. सभेचे इतिवृत गहाळ करण्यात आले होते. ठेवीदारांनी मोर्चा काढला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -