घरमहाराष्ट्रनाशिकमुंबई-आग्रा महामार्गावरील प्लास्टिक मोल्डिंग कंपनीला आग

मुंबई-आग्रा महामार्गावरील प्लास्टिक मोल्डिंग कंपनीला आग

Subscribe

सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी नाही

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारातील बंद असलेल्या प्लास्टीकच्या मॉडेल, पुतळे तयार करणार्‍या गोयंका प्लास्टीक कंपनीत सोमवार (दि. २८) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारात अचानक भिषण आग लागल्याने कंपनीतील व परिसरातील प्लास्टीकचे मॉडेल, पुतळे जळून खाक झाले. ही आग विद्युत तारेच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असुन अद्याप आगीचे कारण समजले नसल्याने तर्क वितर्क वर्तवले आहे.

या कंपनीत प्लास्टिकचे मॉडेल पुतळे तयार केले जात होते मात्र काही कारणास्तव गेल्या अनेक दिवसांपासून ही कंपनी बंद अवस्थेत असुन पूर्वी या कंपनीत मोठ्या प्रमाणात अनेक पुतळे तयार होत होते अशी माहिती कंपनीच्या माजी कामगारांनी दिली. या आगीत संपूर्ण प्लास्टिकचे पुतळे जळून खाक होऊन आकाशात धुराचे लोट पहावयास मिळाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

- Advertisement -

आग लागल्याची माहिती समजताच महामार्ग सुरक्षा पोलीस पथक, महिंद्रा कंपनी अग्निशमन दलाचे हरीश चौबे यांच्यासह नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणल्याने परिसरातील इतर भागातील कंपन्या सुरक्षीत राहील्या. यावेळी महामार्ग सुरक्षा पथक, नगरपरिषद व महिंद्रा कंपनीच्या अग्नीशमन दलाने आग विझवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -