घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरी येथे लग्नतिथी ठरताहेत अपघात वार

इगतपुरी येथे लग्नतिथी ठरताहेत अपघात वार

Subscribe

वर्‍हाडींचे अपघात वाढल्याने आ. खोसकरांनी व्यक्त केली चिंता

इगतपुरी : लग्नाला जाण्यासाठी व लग्न मुहूर्त हुकू नये यासाठी वर्‍हाडी मंडळी बरीच धावपळ करताना दिसून येत आहे. मात्र या घाई गडबडीत अनेक वर्‍हाडी मंडळी अपघाताला सामोरे जाताना दिसत आहे. या आठवड्यात बर्‍याच वर्‍हाडी मंडळींचे अपघात वाढल्याने हा लग्न मुहूर्त की अपघात मुहुर्त? असा आमदार हिरामण खोसकरांनी संतापजनक सवाल उपस्थित केला आहे.

आज दिवसभरात जितके लग्न लावले तितकेच अपघात ग्रस्त रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे समाज भरकटतोय का, असा सवाल उपस्थित झाला आहे. एवढी जीवघेणी लगीनघाई कितपत योग्य आहे. लग्न सोहळे, समारंभात आवर्जुन उपस्थिती दर्शवावी मात्र स्वतःचे व कुटुंबीयांचे जिवाशी खेळून जिवघेणी कसरत करणे अयोग्य आहे.

- Advertisement -

रहदारीच्या ठिकाणी व महामार्गावर वाहन चालविताना विशेष दक्षता घेऊन काळजी घ्यावी, असे भावनिक आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे. एकाच दिवसात अनेक अपघात ग्रस्तांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी आमदार खोसकर यांनी जखमींची विचारपूस करत व्यवस्थित उपचार करण्याच्या डॉक्टरांना सूचना केल्या.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -