घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीची होणार चौकशी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीची होणार चौकशी

Subscribe

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; सहकार आयुक्तांचे आदेश

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीची चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. विशेष म्हणजे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून ही चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केलेली नोकर भरती प्रक्रीया राबवितांना नियम डावलून, अनुशेष न भरती ही प्रक्रीया राबविल्याचा तसेच यात कथित गैर व्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गिरीष मोहिते यांनी जिल्हा उपनिंबधकांसह विभागीय सहनिंबधक कार्यालयाकडे करत, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.

तसेच याबाबत मोहिते यांनी विभागीय सहनिंबधक कार्यालयासमोर आंदोलन देखील केले होते. तत्कालीन विभागीय सहनिंबधक यांनी तक्रारींची दखल घेत त्यावेळी संचालक मंडळाला सहनिंबधकास यावर कारवाई करण्याचे अधिकार आहे का? यासंदर्भात शासनाला पत्र देत अभिप्राय मागविला होता. शासनाच्या सहकार विभागाने या तक्रारींच्या अनुषगांने विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागविला. त्यानुसार सहकार विभागाने निंबधक हे बँकेच्या संचालक मंडळाच्या कोणत्याही सदस्यास काढून टाकण्यासाठी सक्षम प्रधिकारी आहेत. तसेच संचालक मंडळाच्या कोणत्याही सदस्यांविरूध्द आरोप असलेल्या गुन्हयाची पोलिस अधिकार्‍यांकडून चौकशी तपासणी करण्यासाटी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १७ ए (१) (सी) अतंर्गत मान्यतेचा निर्णय घेण्यासाठी सक्षम प्रधिकारी असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

त्यामुळे या प्रकरणी विभागीय सहनिंबधक यांनी लाचलुचपत विभागाला चौकशीची परवानगी देण्याबाबत पुढील कार्यवाही करून तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभागास कळविण्यात यावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी संस्थांचे सहनिंबधक श्रीकृष्ण वाडेकर यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रात नमूद केले आहे.

जिल्हा बँकेची 270 कोटींची कर्जवसूली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच महिन्यात राबवलेल्या कर्जवसुली मोहिमेतून १४ टक्के वसुली झाली आहे. गतवर्षी ३१ मार्च २०२१ अखेर ही वसुली केवळ ९ टक्के होती. या आर्थिक वर्षात बँकेची एकूण वसुलीपात्र थकबाकी २१८० कोटी रुपये असून त्यापैकी ३१ मार्च २०२२ अखेर २७० कोटींची वसुली प्रशासकांनी केली आहे. यात विशेष म्हणजे जप्त केलेल्या १९४ ट्रॅक्टर लिलावातून ५ कोटी ९ लाख रूपयांची वसुली झाली आहे. शेतकर्‍यांची आर्थिक वाहिणी असलेली जिल्हा बॅक आर्थिक संकटात सापडली आहे. नोटाबंदी, वाढती थकबाकी यामुळे बँकेचा एनपीए वाढला.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -