घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपत्नीचे बदनामी करणारे पत्रक वाटल्याचा संशयातून डॉक्टरवर हल्ला

पत्नीचे बदनामी करणारे पत्रक वाटल्याचा संशयातून डॉक्टरवर हल्ला

Subscribe

हल्लेखोरास सात दिवसांची पोलीस कोठडी

दिंडोरी रोडवरील बाजार समिती शॉपिंग सेंटरमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी (वय ४९) यांच्यावर कोयत्याने तब्बल १९ वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयित हल्लेखोर राजेंद्र मोरे (वय ३७, रा. नाशिक) याला पोलिसांनी संतोष टी पॉइंट येथे अटक केली. पोलिसांनी मोरे यास रविवारी (दि.२५) विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवली. पत्नीची बदनामी केल्याच्या संशयातून हल्ला केल्याची कबुली संशयित मोरे याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, डॉ. राठी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली.

पंचवटी पोलीसांनी संशयित हल्लेखोर राजेंद्र मोरे याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान संशयिताने आपल्या घरा जवळ व सध्या पत्नी नोकरी करत असलेल्या परिसरात तीची बदनामी करणारे पत्रक छापून अज्ञात लोकांनी वाटले होते. या बदनामी पत्रकामागे डॉ. राठी असल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याचे संशयित हल्लेखोराने पोलीसांना सांगितले.

- Advertisement -

संशयित हल्लेखोराची पत्नी रोहिणी दाते-मोरे सुयोग हॉस्पिटलमध्ये काही वर्षांपूर्वी नोकरीला होती. त्यावेळी तिने सुमारे ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर येताच तिला नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी रोहिणीला पुन्हा डॉ. राठी यांनी हॉस्पिटलऐवजी त्यांच्या जमिनींच्या कागदपत्रांची नोंदणी व इतर खासगी कामासाठी नोकरीवर रूजू करून घेतले. परंतु, त्यातही लाखो रूपयांचा घोटाळा केल्याचे समोर येताच राठी यांनी तिला व तिचा पती राजेंद्र मोरे याला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेत अपहार केलेल्या रकमेची मागणी केली. त्यावर थोडा वेळ मागत पैसे परत करणार असल्याचे मोरे याने सांगितले. परंतु, राठींकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती आणि मोरे दाम्पत्य पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होते.

पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, मिथुन परदेशी यांच्यासह शेखर फरताळे, अशोक काकड, संतोष जाधव, राजेश सोळसे, यतीन पवार, श्रीकांत कर्पे, युवराज गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून संशयित मोरे यास ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -