घरमहाराष्ट्रनाशिकठाणापाडा येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिरांची दूरवस्था

ठाणापाडा येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिरांची दूरवस्था

Subscribe

पुरातत्व खात्याबरोबरच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सागर पाटील , गंगापूर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथील हेमाडपंथी तीन मंदिरांची प्रचंड दूरवस्था झाली असुन, पुरातत्व खात्याबरोबरच तालुक्यातील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाली आहे. यासंदर्भात शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी संबंधित विभागांकडे तक्रार केली.

शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे दुर्ग संवर्धक खैराए या किल्ल्यावर संवर्धनासाठी गेले होते. त्यांनी तेथेच मुक्काम केला. रविवारी हे दुर्ग संवर्धक गावात फिरत असताना त्यांना गावातील एका तरुणाने या मंदिरांविषयी माहिती दिल्यानंतर शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी पाहणी केली तेव्हा त्यांना जैन, बौद्ध आणि हिंदूंची तीन मंदिरे दिसून आली. या तिन्ही मंदिरांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याचे दिसून आले. या मंदिरांची मोठी पडझड झालेली दिसून आली. ठाणापाडा गावातील मध्यवर्ती ठिकाणी ही मंदिरे आहेत.

- Advertisement -

ठाणापाडा गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. खैराए किल्ला याच ठिकाणी आहे. २२९६ फूट उंचीवरील खैराए किल्ल्याच्या पायथ्याशीच ठाणापाडा गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७६ मध्ये हा किल्ला जिंकला. या किल्ल्याप्रमाणेच ठाणापाड्यातील मंदिरांची ओळख जनतेला व्हावी, अशी ही ऐतिहासिक मंदिरे आहेत. मात्र या तिन्ही मंदिराची सध्या मोठी दुरावस्था झालेली आहे. या मंदिराच्या परिसरात केरकचरा टाकला जातो. इतर दोन मंदीरे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. मंदिरातील अनेक मूर्ती ऊन, वारा, पाऊस खात आहेत.

या मंदिरांची दूर्दशा थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने या मंदिराची पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करणारे निवेदन या दुर्ग संवर्धकांनी पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक आरती आळे यांना दिले.
यावेळी शाम गव्हाणे, सागर पाटील, संतोष मिंदे, अनिल दाते, महेंद्र कोल्हे हे उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -