घरमहाराष्ट्रनाशिकओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे शनिवारी चक्काजाम

ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे शनिवारी चक्काजाम

Subscribe

प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी दिली माहिती

महाराष्ट्रातील अकार्यक्षम सरकार मुळेच बहुजन समाजाला आरक्षणापासून दूर जावे लागले असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला. ओबीसी समाजाला पूर्वीप्रमाणे राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मंडळ स्तरावर येत्या शनिवारी (दि. २६) जूनला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार फरांदे यांनी यावेळी दिली.

आरक्षणाबाबतयाबाबत भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार फरांदे यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ च्या आदेशान्वये रद्द केले आहे. त्यामुळे सध्या ओबीसी समाजासाठी राज्यात आरक्षण नाही. देशात सर्वत्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळत असताना फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मात्र ओबीसींना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. देशात अनेक राज्यात ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण दिले जात असताना महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. तर ओबीसी समाजाला देखील आरक्षण गमवावे लागले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने दिनांक ३१ जुलै २०१९ ला काढलेला अध्यादेश या सरकारने कायद्यात परिवर्तितन न करता रद्द का केला? ५ मार्च २०२१ ला विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली असताना व राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून वस्तुस्थितीदर्शक माहिती गोळा करण्याची मागणी केलेली असताना, तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत देखील राज्य मागासवर्ग आयोगची स्थापना करण्याची मागणी केली असताना त्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष का केले? देवेंद्र फडणीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देताना गायकवाड आयोगामार्फत मराठा समाजासाठी आवश्यक माहिती राज्य सरकारने गोळा केलर होता याची आठवण करून देताना, हा प्रश्न केंद्राकडे पाठवून राज्य सरकार ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या भावनांचा अंत न पाहता तत्काळ राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून एप्मिरिकल डाटा गोळा करून ओबीसी समाजाचे केलेले आरक्षण परत द्यावे अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. पत्रकार परिषदेद भारतीय जनता पार्टी ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ , भाजपा शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, ग्रामीण भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, भाजपा ओबीसी शहराध्यक्ष चंद्रकांत थोरात, भाजपा ओबीसी युवा जिल्हाध्यक्ष मनोज शिरसाठ, राजेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मंडल स्तरावर अंदोलने

येत्या जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीआंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात मंडल स्तरावर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येईल व सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट करताना. जास्तीत-जास्त नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाला जागे करावे असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.

ओबीसी मंत्री मोर्चे काढण्यात व्यस्त

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर १३ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. परंतु, गेले १५ महिने राज्य सरकारने तारीख मागण्या व्यतिरिक्त काही केले नाही. तर राज्यातील ओबीसी मंत्री सर्वोच्च न्यायालयातील केसकडे लक्ष देण्याचे सोडून ओबीसी समाजाचे मोर्चे काढण्यात व्यस्त होते. त्यामुळे आज ओबीसी समाजावर आरक्षण गमावण्याची वेळ आली असल्याचे प्रा. फरांदे म्हणाल्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -