घरताज्या घडामोडीगर्गे स्टुडिओ : साडेआठ लाखांच्या लुटीतील परप्रांतिय टोळीला अटक

गर्गे स्टुडिओ : साडेआठ लाखांच्या लुटीतील परप्रांतिय टोळीला अटक

Subscribe

शुक्रवारी पहाटे झाली होती सशस्त्र लूट, दरोडेखोरांनी ब्राँझ धातूच्या पुतळ्यांचे भाग नेले होते पळवून

नाशिक – शिल्पकार मंदार गर्गे यांच्या बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओत शुक्रवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने सुरक्षारक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून ८ लाख ४० हजारांचे ब्राँझ धातूचे भाग चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. सातपूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवत या घटनेतील परप्रांतिय टोळीला अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

सुरक्षारक्षक जयदेव जाधव यांनी सातपूर पोलिसांत घटनेबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन पथके रवाना केली होती. गर्गे स्टुडिओत विविध धातूंपासून पुतळे तयार करण्याचा कारखाना आहे. शुक्रवारी पहाटे १० दरोडेखोरांच्या टोळीने कारखान्यात प्रवेश करत सुरक्षारक्षक जाधव यांना कोयत्याचा धाक दाखवत कारखान्यातील ब्राँझच्या विविध पुतळ्यांचे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे भाग चोरुन नेले होते. हे साहित्य नेण्यासाठी दरोडेखोरांनी वाहन मागवले होते. ही बाब पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर याच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेज तपासत दरोडेखोरांचा माग काढला. त्यानुसार पोलिसांनी ५ जणांच्या टोळीला अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

- Advertisement -

या मुद्देमालाची झाली होती चोरी

गर्गे स्टुडिओत सुरक्षारक्षकावर हल्ला केल्यानंतर दरोडेखोरांनी त्याच्याकडून कारखान्याच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे १ हजार ४०० किलो ब्राँझ धातूची लूट केली. त्यात संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे साडेतीनशे किलो वजनाचे सुटे भाग, वीणा, शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काही भाग चोरी केले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -