घरमहाराष्ट्रनाशिकViral Video: त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगमधून पाण्याचे बुडबुडे

Viral Video: त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगमधून पाण्याचे बुडबुडे

Subscribe

व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधान

बारा ज्योर्तिलिंगपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरच्या ज्योर्तिलिंगामधून पाण्याचे बुडबुडे निघाले. या घटनेचा व्हिडीओही परिसरात व्हायरल झाला आहे. याचा पिंडीतून पाण्याचे बुडबुडे निघण्याच्या घटनेचा संबंध शिवभक्त आणि भाविकांनी आस्थेशी लावल्याने त्र्यंबकमध्ये चर्चेला उधान आले होते.

त्र्यंबक ज्योर्तिलिंगातून पाण्याचे बुडबुडे निघत असल्याचे पहाटे सव्वा पाच वाजता पुजाविधी करण्यसाठी गेलेल्या पुजार्‍यांच्या लक्षात ही बाब आली. पिंडीतून पाण्याचे बुडबुडे निघणे ही बाब त्र्यंबकमध्ये शिवशंकराच्या प्रकोपाची पूर्वसूचना असते. यापूर्वीही अशी घटना घटल्याने त्र्यंबकवर संकट आल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे होते. त्र्यंबकेश्वर पिंडीतून पाण्याचे बुडबुडे निघण्याचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याला चांगलेच व्हिवर लाभले होते. तर अनेकांच्या कॉमेंट आलेल्या दिसत होत्या.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगमधून पाण्याचे बुडबुडे

१२ ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगातून पाण्याचे बुडबुडे

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜುಲೈ 27, 2019

 

- Advertisement -

आठवर्षापूर्वीही अशी घटना

त्र्यंबकच्या पिंडीतून पाणी झिरपणे, अशी घटना आठवर्षापूवीही घडली होती. हे पाहण्यासाठी भाविकांनी त्र्यंबक मंदिरात गर्दी केली होती. तसेच शिवमंदिरात अशी जेव्हा घटना घडते. तेव्हा त्याचा संकटांशी संबंध जोडण्याचाही येथील काही नागरिकांनी प्रयत्न केला असल्याची चर्चा येथे झाली. सध्या सगळीकडे परिसरात पाणी असल्याने त्याचा झिरपा पिंडीतून होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

नैसर्गिक स्त्रोतांवर अतिक्रमण

त्र्यंबकेश्वरमध्ये आज सुमारे 140 मिलीमीटर पाऊस झाल्याने शहरातून पाण्याचे लोट वाहत होते. त्याचबरोबर कुशावर्त मार्गाकडे जाणार्‍या मार्गावर पाण्याच्या प्रवाहात वाहने घसरून जात होते. दूकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांना विक्री साहित्य सुरक्षित जागी हलवावे लागत होते. त्र्यंबकेश्वरमध्ये पुरजन्यस्थिती हा त्र्यंबकेश्वराचा प्रकोप असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुुरू होती.

पाण्याचा प्रवाह थेट आवारात येत असल्याने ते पाणी मंदिरात झिरपते..

त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीच्या प्रवाहावरच स्लॅब टाकून प्रवाह अडवलेला आहे. तसेच जागोजागी काँक्रिटचे रस्ते करण्यात आलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जातांना घरांमध्ये, दूकानात शिरते. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरालगतचे रस्ते उंच झाल्याने पाण्याचा प्रवाह थेट आवारात येत असल्याने ते पाणी मंदिरात झिरपते. गोदावरी नदीचा प्रवाह आडवला गेला आहे. आता निलगंगेचाही नैसर्गिक प्रवाह वळविण्याचा घाट नगरपालिकेने घातला आहे. ललिता शिंदे, माजी विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -