घरमहाराष्ट्रनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

Subscribe

वनविभाग मात्र अजूनही सुस्तच असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष

जायखेडा  : अंबासन गाव व परिसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच असून वळवाडे शिवारातील अशोक सोनवणे या शेतक-याच्या शेतातील अडीच वर्षीय गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवार (ता. २६) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी प्रत्यक्षदर्शी शेतक-याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने वासराला सोडून बाजरीच्या पिकात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याने हैदोस घातला असून, पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात शिकार होत आहेत. वळवाडे शिवारातील शेतकरी माणिक सोनवणे यांच्या गायीच्या वासरावर बिबट्यांने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच शेतकरी अशोक सोनवणे यांच्या गोठ्यात पहाटेच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या अडीच वर्षांच गायीच्या वासरावर हल्ला चढवत फरफटत नेले. यावेळी गायींनी हंबरडा फोडल्याने सोनवणे कुटुंबियांना जाग आली आणि त्यांना वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास येताच आरडाओरडा सुरू केला. परिसरातील शेतक-यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने बाजरीच्या शेताजवळ जखमी वासराला सोडून पिकात धूम ठोकली.

मालेगाव हद्दीतील वनकर्मचा-यांना याबाबत माहिती दिली असतांनाही ते फिरकले नसल्याने शेतक-यांत वनविभागाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. याच परिसरातुन अनेक चिमुकले व विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असतात. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

- Advertisement -
जखमी वासरू

वनविभागाच्या संथ कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

बिबट्याच्या भीतीपोटी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केला असून शेतकऱ्यांवरही हल्ले केले आहेत. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वनविभागाची कारवाई संथगतीने सुरु असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उपल्ब्ध करून, या गाव परिसरात वनविभागाने गस्त वाढविणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. – माणिक सोनवणे, शेतकरी, वळवाडे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -