घरमुंबईऔषधांमधील रेनिटायडीन घटकामुळे होऊ शकतो कर्करोग?

औषधांमधील रेनिटायडीन घटकामुळे होऊ शकतो कर्करोग?

Subscribe

औषधांमधील रेनिटायडीन घटक कर्करोगाला पुरक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अॅसिडीटीवर देण्यात येणाऱ्या गोळ्यांमध्ये सर्रास रेनिटायडिन घटकांचा वापर करण्यात येतो. तर, प्रत्येक तीन भारतीयांमागे १ भारतीय रेनिटायडीन घटक वापरलेल्या गोळ्या घेत असल्याची माहितीही समोर आली आहे. रेनिटायडिन हे अॅसिडिटीवर उपचार म्हणून सर्रास वापरले जाते. रेटँक, बसीलोक, झन्टॅक, हिस्टॅकसारख्या प्रसिद्ध गोळ्यांमध्ये हा घटक वापरला जात आहे. या रेनिटायडीनमध्ये कर्करोगाला पुरक रसायन (एनडीएमए) असल्याचे आढळले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय औषध नियंत्रक जनरल यांनी थेट केंद्रीय अन्न आणि औषध प्रशासनाला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

रेनिटायडीनची औषध विक्री कॅनडा, सिंगापूर आणि बहारिन सारख्या देशांमध्ये बंद यूएस फूड अँड ड्रगच्या पुढाकाराने बंद करण्यात आली. पण, यावर भारत सरकार प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. या औषधांच्या पडताळणीसाठी प्रमुख औषध नियंत्रकांकडून त्याबाबत केंद्रीय अन्न आणि औषध प्रशासन विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. यात रेनिटायडिन औषध शुद्धतेबाबत विचार करण्यात यावा असे सुचवण्यात आले आहे. रेनिटायडिन हा घटक औषधे, गोळ्या आणि इंजेक्शन अशा सर्व प्रकारात वापरण्यात येत आहे. तसेच, हे एच वर्गवारीत येत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यात येऊ नये, असेही या पत्रातून सुचवण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्रीय अन्न व औषध प्रशासन (औषध) विभागाच्या अंतर्गत या औषधांचा वापर होत असल्याने उत्पादक वितरक यांनी पडताळणी करुन रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत, असे जनरल ड्रग कंट्रोलर डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी सुचवले आहे.

हेही वाचा –

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -