घरक्राइमभरस्त्यात कारची तोडफोड; धमकावत लुटमार

भरस्त्यात कारची तोडफोड; धमकावत लुटमार

Subscribe

भररस्त्यात कार अडवून अनोळखी दोघांनी एका धमकावत २० हजार रुपये काढून घेतल्याची
घटना शनिवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजता एकलहरा रोड, किर्लोस्कर कंपनीमागे, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी हरिष संघवी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुनमचंद पोपटलाल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हरिष संघवी हे मुलासमवेत कारने जात असताना अनोळखी दोन तरुण दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांनी कार अडवून काच फोडली. त्यानंतर संघवी यांना दोघांनी मारहाण केली. तुमचा जीव प्रिय असेल तर पी. पी. जैन यांनी सांगितलेली रक्कम देवून टाका. परत आम्हाला समजावयला यायची वेळ आली तर तुम्हाला ठार करु, असे दोघेजण म्हणाले. त्यानंतर भयभीत झालेल्या संघवी यांच्या मुलाने २० हजार रुपये दिले. तितक्यात एक कार आली. कारमध्ये पुनमचंद जैन होते. जैन यांनी दोघांना निघून जाण्याचा इशारा केला. त्यानुसार दोघे निघून गेले. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. हांडोरे करत आहेत.

- Advertisement -

चर्च परिसरातून दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना होली क्रॉस चर्च, त्र्यंबक नाका येथे घडली. याप्रकरणी संदीप देवतवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप देवतवाल हे ख्रिसमसनिमित्त होली क्रॉस चर्चमध्ये आले होते. त्यांनी दुचाकी चर्च परिसरात पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता दुचाकी चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस नाईक एम. जी. सूर्यवंशी करत आहेत.

भरधाव ट्रकची कारला धडक

भरधाव ट्रकने दिलेल्या कारच्या धडकेत चौघेजण जखमी झाल्याची घटना महाराष्ट्र दरबार हॉटेलसमोर, आडगाव येथे घडली. याप्रकरणी हर्षद सुनील कदम यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षद कदम हे कारने आडगाव परिसरात आले. कारमध्ये कदम यांचे मित्र सागर अंबरपुरे, संकेत निकम, रौनक जाधव होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेला ट्रक त्यांच्या कारवर आदळला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. पुढील तपास पोलीस हवालदार बस्ते करत आहेत.

- Advertisement -

धर्माजी कॉलनीतून दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, गंगापूर येथे घडली. याप्रकरणी मनोज राठोड यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज राठोड यांनी दुचाकी धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर येथे पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता दुचाकी लंपास झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस नाईक बागूल करत आहेत.

अंबड लिंक रोडवर युवकाची आत्महत्या

अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर परिसरात एका युवकाने रविवार (दि २६) सकाळी ९ वाजे दरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शहाबाज अब्दुल वाहिद चौधरी (वय २0, रा. संजीव नगर, सातपूर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौधरी याने दत्तमंदिर परिसरातील मोकळ्या जागेतील चिंचेच्या झाडाला दोरीच्ने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. पुढील तपास पोलीस नाईक केदारे करत आहेत.

कर्तव्य बजावत असताना पोलिसाचा मृत्यू

कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२६) दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घडली. पोलीस शिपाई दीपक भागवत मोरे (वय ५१, रा.धात्रक फाटा, पंचवटी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोरे हे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागला. पोलिसांनी त्यांना उपचारार्थ लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार बस्ते करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -