घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्ता १८ महिने राहणार बंद

सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्ता १८ महिने राहणार बंद

Subscribe

अधिसूचना जारी, काम टप्प्याटप्प्याने करण्याची व्यापार्‍यांची मागणी

सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता मॉडेल रोडच्या कामासाठी खोदला जाणार आहे. ८ एप्रिल ते ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत असे १६ महिने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील व्यापार ठप्प होणार असून या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्याची मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे. यामुळे इतर मार्गांवर मात्र वाहतूकीचा ताण वाढणार आहे.

महापालिकेच्यावतीने जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा घाट बांधला गेला आहे. या संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने हा मार्ग तब्बल १६ महिने म्हणजे ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे या परिसरात शासकीय कार्यालय, बस स्थानक, दुकाने, रहीवासी परिसर असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हे काम सुरू होत असल्याने व्हीआयपींची ने आण करणे गैरसोयीचे होणार आहे. मात्र हा मार्ग बंद राहणार असल्याने या मार्गावरील व्यवसाय ठप्प होणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम करावे अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

- Advertisement -

या मार्गावर प्रवेश बंद
कॅनडा कॉर्नर ते सीबीएस
जिल्हा रूग्णालय, ठक्कर बाजार, किशोर सुधारलयमार्गे मेळा स्थानक
जलतरण तलाव, रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएस
राका कॉलनीमार्गे, कुलकर्णी गार्डनमार्गे सीबीएस

२६ कोटींचा मॉडेल रोड
या मॉडेल रोडसाठी २६ कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे. रस्त्याच्या दोनही बाजूला २ मीटर रूंदीचा फूटपाथ राहील. दुभाजक, पावसाळी सर्व्हिस लाईन, जलवाहिनीसाठी डक्ट राहतील.

- Advertisement -

हे असतील पर्यायी मार्ग
कॅनडा कॉर्नरमार्गे सीबीएसकडे जाण्यासाठी जुना गंगापूर नाका मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभमार्गे इतरत्र
कॅनडा कॉर्नर, जुने पोलीस आयुक्तालय, मायको सर्कल, मोडक सिग्नलमार्गे इतरत्र

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -