घरमहाराष्ट्रनाशिकओटीपी मिळवत ७४ हजारांना गंडा

ओटीपी मिळवत ७४ हजारांना गंडा

Subscribe

बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे भासवत एकाने एटीएम कार्डची माहिती व ओटीपी मिळवत एका महिलेला ७४ हजार ८९८ रुपयांना गंडा घातला.

बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे भासवत एकाने एटीएम कार्डची माहिती व ओटीपी मिळवत एका महिलेला ७४ हजार ८९८ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी दीपिका अनिल कुलकर्णी (४३, रा.राणेनगर) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दीपिका कुलकर्णी यांना १३ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधला. बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे भासवत कुलकर्णी यांना युनियन बँकेत इन्शुरन्स काढण्यासाठी एटीएम कार्डचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा, असे सांगितले. संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवत कुलकर्णी यांनी लगेच कार्डचा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. त्यानंतर मोबाईल आलेला ओटीपी क्रमांक विचारला असता त्यांनीही लगेच मोबाइलवर बोलणार्‍या व्यक्तीस सांगितला. कार्डची माहिती व ओटीपी क्रमांक मिळताच संबंधित व्यक्तीने कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून ७४ हजार ८९८ रुपये काढून घेतले. खात्यातून रक्कम गेल्याचे कुलकर्णी यांना एसएमएसवरून समजले. त्यातून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबंधित व्यक्तीने ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल केला, त्या क्रमांकावर कॉल केला असता त्यांना तो क्रमांक बंद असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील तपास करीत आहेत.

- Advertisement -

गोपनीय माहिती सांगू नये

सध्या सायबर गुन्हे वाढत आहेत. ऑनलाइन युगात सायबर सुरक्षेसाठी प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे. बँक कोणालाही खात्याबाबत माहिती विचारत नाही. खातेदारांनी कोणालाही एटीएम व ओटीपीची माहिती देऊ नये. फसवणूक करणारे कॉल आले, तर मोबाईल क्रमांक पोलिसांशी संपर्क साधावा. एटीएम पासवर्ड कोणालाही सांगू नये. एटीएममधून आलेली स्लीप कचर्‍यात टाकताना बारीक तुकडे करून टाका. – तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -