घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘सिव्हिल’ मुक्कामाचा 'प्लॅन' झाला फेल; सुनीता धनगरांना पोलीस कोठडी

‘सिव्हिल’ मुक्कामाचा ‘प्लॅन’ झाला फेल; सुनीता धनगरांना पोलीस कोठडी

Subscribe

नाशिक : न्यायालयाने सोमवारी (दि.५) लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगरच्या पोलीस कोठडीत वाढ केल्याने प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत त्यांनी जिल्हा रुग्णालयात मुक्काम करण्याचा प्लॅन केला. रुग्णालयात धनगरला सायंकाळी पोलिसांनी आणताच धनगरने पाय दुखण्याचा दावा केला. सुमारे दोन तास वैद्यकीय कक्षांमध्ये त्या ये-जा करताना दिसून आल्या. त्यांनी प्रकृती अस्वस्थतेची कारणे डॉक्टरांना सांगितली. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा प्लॅन हाणून पाडला. त्यामुळे धनगरची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

हिंदी शाळेतील निलंबित मुख्याध्यापकाला न्यायाधिकरणाच्या आदेशान्वये त्याच शाळेत नियुक्तीचे आदेश देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच घेणार्‍या शिक्षणाधिकारी सुनीता सुभाष धनगर (५७, रा. रचित सनशाईन, उंटवाडी) आणि लिपिक नितीन अनिल जोशी (४५, रा. पुष्पांकुर, तपोवन) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. दोन दिवसीय कोठडी संपल्यावर त्यांना सोमवारी (दि.५) न्यायालयात हजर केले.

- Advertisement -

न्यायालयाने त्यांना पुन्हा एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. मात्र, त्यांनी पोलीस कोठडीत मुक्काम टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रकृती अस्वस्थतेमुळे दाखल होण्याचा ‘प्लॅन’ केला. त्यांना जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीत तपासणी करण्यात आली. रुग्णालयात त्यांनी पाय दुखण्याचा दावा केला. सुरुवातीला त्या अपघात कक्षात गेल्या. तेथून अतिदक्षता विभागात गेल्या. परत त्या अपघात कक्षाजवळ आल्या.

या ठिकाणी त्या काहीवेळ थांबल्या. रात्री उशीरापर्यंत त्यांच्याकडून रुग्णालयात मुक्कामाचा प्रयत्न चालू होता. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयातून त्यांना नेण्याची परवानगी पोलिसांना दिली. त्यामुळे त्यांची रवानगी कोठडी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -