घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘सावाना’ कार्यकारिणीविरोधातील दावे धर्मादाय सहआयुक्तांनी फेटाळले

‘सावाना’ कार्यकारिणीविरोधातील दावे धर्मादाय सहआयुक्तांनी फेटाळले

Subscribe

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना)च्या सन २०१२-१७ मधील कार्यकारिणीविरोधात श्रीकांत बेणी यांनी दाखल केलेल्या अर्जातील तीनही दावे धर्मादाय सहआयुक्त, नाशिक विभागाचे न्यायमूर्ती टी. एस. अकाली यांनी सोमवारी (दि.१) फेटाळले. त्यामुळे तत्कालीन कार्यकारिणीतील आणि विद्यमान कार्यकारिणीतील अ‍ॅड. अभिजीत बगदे, जयप्रकाश जातेगाव, गिरीश नातू व देवदत्त जोशी यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर आता कोणताही ठपका राहिलेला नसल्याचे सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी सांगितले.

सावानाच्या सन २०१२ ते २०१७ मधील कार्यकारिणीमध्ये प्रा. विलास औरंगाबादकर, किशोर पाठक, मिलींद जहागीरदार, वेदश्री थिगळे, जयप्रकाश जातेगावकर, अ‍ॅड. अभिजीत बगदे, देवदत्त जोशी, गिरीश नातू यांचा समावेश होता. या कार्यकारिणीने सावानाचा सेवाकर भरला नाही, अग्निशमन यंत्रण बसविताना निविदा काढली नाही व नवीन सभासदांचे सदस्यत्व रोखल्याचा आरोप करत श्रीकांत बेणी यांनी केला होता. याप्रकरणी बेणी यांनी २०१४ मध्ये धर्मादाय आयुक्त, नाशिक विभागाकडे अर्ज दाखल केला होता. धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती अकाली यांनी तब्बल आठ वर्षांनी दावे निकाली काढले. त्यामुळे विद्यमान २०२२-२७ च्या कार्यकारिणीतील चौघांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

तंटामुक्त सावानासाठी अर्जदारांच्या भेटीगाठी

सामाजिक संस्थांमध्ये अनेकजण नोकरी व व्यवसाय संभाळून काम करत असतात. काहीजणांकडून चूक होती. ती चूक संस्थेच्या बाहेर जावू नये. सावानातील वाद चौकटीतच मिटले पाहिजेत, ते विधायक दृष्टीकोनातून सावानाबाहेर जावू नयेत. सावानाचा नावलौकिक वाढविण्यासाठी कार्यकारिणीतील सदस्य व सभासद प्रयत्नशील असतात. मात्र, काही पदाधिकार्‍यांची वादविवाद होतात, ते वाद सावानाबाहेर जावू नयेत. इतर दाव्यांसंदर्भात अर्जदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत, असे सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -