घरमहाराष्ट्रनाशिकस्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद, जपले गोदावरीसह रामकुंड परिसराचे पावित्र्य

स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद, जपले गोदावरीसह रामकुंड परिसराचे पावित्र्य

Subscribe

जीबीएसने संस्थेच्या वतीने रामकुंड परिसरात स्वच्छता अभियान

जीबीएसच्या (गोसावी बहुउद्देशीय संस्था) माध्यमातून राबविण्यात आलेल्या गोदा स्वच्छता अभियानामुळे रामकुंड परिसराचे पावित्र्य जपले गेले. या अभियानाला संस्थेच्या सदस्यांसह नागरिकांचाही प्रतिसाद लाभला.

धार्मिकदृष्ट्या गोदावरी आणि त्यातही रामकुंड परिसराला मोठे महत्त्व असल्याने देशभरातून शेकडो भाविक विविध विधींसाठी आणि पर्यटक येत असतात. मात्र, गोदापात्राच्या अस्वच्छतेमुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड होतो. या पार्श्वभूमीवर जीबीएस संस्थेने स्वच्छता अभियान हाती घेतले होते. या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेने केले होते. त्यामुळे सर्वच घटकांचा या अभियानाला प्रतिसाद लाभला. या अभियानात संस्थेच्या अध्यक्षा सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, स्वयंसेवक तुषार धुमाळ, श्रुती भुजबळ, भूषण चौधरी, संजीव गिरी, सतीश गुरगुडे, ज्ञानदीप पाटील, विशाल माळी, देविदास गिरी, सागर कराड, किरण महाजन, अनिल भोसले, दत्ता वाघ, आसिफ शेख, अनिल बागड, संगीत वाघ, सीमा मान, राकेश खरात, भास्कर सोनावणे, प्रवीण पवार, महेश चांद्रमोरे, मृणाली बोरसे यांसह समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी शुभम पगारे, स्नेहल सोनावणे आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -