घरमहाराष्ट्रनाशिक२१ हजार ईव्हीएम यंत्रांची पडताळणी पूर्ण

२१ हजार ईव्हीएम यंत्रांची पडताळणी पूर्ण

Subscribe

विधानसभा निवडणूक सज्जता ः सुटीच्या दिवशीही निवडणूक कामकाज सुरू

येत्या दहा दिवसांत विधानसभा निवडणूक आचारसंहीता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक विभागाने जिल्हयाला प्राप्त ईव्हीएम यंत्रांची तपासणीची प्रक्रिया पुर्ण केली आहे. २१ हजार २८७ मतदान यंत्रांची प्राथमिक पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून, सुटीच्या दिवशी देखील निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात हजर होते.

लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्राधान्य देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीनेही वेग घेतला आहे. ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हयातील १५ विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हयाला पुणे आणि बंगलोरहून मतदान यंत्र प्राप्त झाली. अंबड येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात या मतदान यंत्रांची तपासणी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती. ३१ ऑगस्टपर्यंत ही मतदान यंत्रे पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानूसार ही पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. सुमारे साडेपाचशे मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने हे मशिन या प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहेत.

२१ हजार २८७ मतदान यंत्रांची तपासणी

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ हजार २८७ मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार असून, यामध्ये ८ हजार ५७८ बॅलेट युनिट, ६ हजार १७६ कंट्रोल युनिट आणि ६ हजार ५३३ व्हीव्हीपॅटची प्राथमिक तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -