घरताज्या घडामोडीनाशिकमधील तरुणाला करोना व्हायरसची लागण?

नाशिकमधील तरुणाला करोना व्हायरसची लागण?

Subscribe

संशयित तरुण जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.

नाशिक शहरात इटली येथून आलेल्या युवकास शनिवारी त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक उपचार करत असून त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. नमुने तपासणी अहवाल आल्यावर या युवकाला करोना झाला आहे किंवा नाही, हे निष्पन्न होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे. चीनमध्ये थैमान घातलेल्या करोनासदृश रुग्ण नाशिकमध्येही आढळल्याच्या चर्चेने जिल्हा रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण आहे.

करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून, राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ बेड उपलब्ध आहेत. करोनासदृश रुग्ण गुरुवारी इटलीवरून अंबड शिवारातील बहिणीकडे आला होता. तो दोन वर्षांपासून इटली येथे शिक्षण घेत आहे. भारतात येण्यापूर्वी तो इटलीवरून आफ्रिका आणि श्रीलंकेमध्ये गेला होता. त्यानंतर तो भारतात आला. त्याची मुंबई विमानतळावर आरोग्य तपासणी करण्यात आली असता करोनाची लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला पुढे जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार तो गुरुवारी नाशिकला आला.

- Advertisement -

व्यक्ती करोनाबाधित आहे की नाही हे अस्पष्ट 

करोनाबाधित भागातून भारतात येणार्‍या प्रत्येक नागरिकाची १४ दिवस तपासणी केली जात आहे. त्याला सर्दी, खोकला आणि ताप आला नसल्याची वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत खात्री करून घेतली जात आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आलेल्या व्यक्तीला शनिवारी त्रास होऊ लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हा व्यक्ती करोनाबाधित आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.

५५ हजार ७८५ प्रवाशांची तपासणी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २७ फेब्रुवारीपर्यंत ४५८ विमानांमधील ५५ हजार ७८५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशांतील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे. बाधित भागातून ३१२ प्रवासी महाराष्ट्रात आले आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीनमधील वुहान शहरातून येणार्‍या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे निदान करण्याचे धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. विविध देशांतील बाधित भागातून येणार्‍या प्रवाशांवर १४ दिवस लक्ष ठेवण्यात येते. रुग्णालयात दाखल रुग्णावर उपचार सुरू असून, तपासणी अहवालावरून करोना झाला किंवा नाही, ते स्पष्ट होईल. – डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक


हेही वाचा – करोनामुळे उद्योगपतींचे निघाले दिवाळे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -