Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र आई-वडिलांचा छळ करणाऱ्या दारुड्या मेहुण्याला दाजीनेच संपवले

आई-वडिलांचा छळ करणाऱ्या दारुड्या मेहुण्याला दाजीनेच संपवले

Subscribe

नाशिक : मद्यधुंद अवस्थेत नेहमी आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणाने मेहुण्याने शालकाच्या हातोडीने वर्मी घाव घालत खून केल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री नांदगावमधील आनंदनगर भागात घडली. खूनाचा आरोप असलेला आरोपी नगरपालिका शाळेचा मुख्याध्यापक आहे. वाल्मिक साहेबराव ठाकूर असे मृत्यू झालेल्या शालकाचे नाव आहे. ईश्वर ठाकूर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

वाल्मिक ठाकूर हा सूरत येथे खासगी नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो आपल्या स्वतःच्या घरी नांदगाव येथे आला होता. त्याने दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण केली होती. मंगळवारी त्याचे मेहुणे ईश्वर देवराम ठाकूर व चुलतभाऊ प्रदीप निवृत्ती ठाकूर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी वाल्मिक ठाकूरबरोबर दोघांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर आरोपी ईश्वर ठाकूर याने प्रदीप ठाकूरला मी याला माझ्या पद्धतीने समजावतो, असे सांगितले होते.

- Advertisement -

घरी परतल्यावर प्रदीपला शेजारील काकांच्या घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने जाऊन पाहिले असता आरोपी ईश्वर ठाकूर हा शालक वाल्मिक ठाकूर याच्या डोक्यावर व पायावर हातोड्याने घाव घालत होता. यावेळी आरोपीने प्रदीप यास याबाबत कुणास काहीही सांगितले तर तुझीही अशीच अवस्था करेल, असा दम दिला. अर्ध्या तासानंतर आरोपीने रुग्णवाहिका बोलावून वाल्मिकला ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी प्रदीप ठाकूर याने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ईश्वर ठाकूरविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -