घरक्राइमजिल्हा बँकेच्या एसआयटी चौकशीची मागणी

जिल्हा बँकेच्या एसआयटी चौकशीची मागणी

Subscribe

नाशिक : बड्या थकबाकीदारांकडे दुर्लक्ष करत गरीब शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरचे लिलाव करायचे अन बँकेचे कर्मचारीच नातेवाईकांना लिलावात जमिनी आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी पुढे करतात. त्यासाठी लिलाव बोलावता का? अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बँकेच्या (एनडीसीसी) अधिकार्‍यांना जाब विचारला. बँकेचा परवाना रद्द होण्याची वेळ आली असताना टॉप-१०० थकबाकीदारांवर काय कारवाई केली, असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बँकेच्या कारभारावर ताशेरे ओढत बँकेची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा इशारा दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. बँकेकडे टॉप- १०० थकबाकीदारांची यादी तयार असताना सामान्य शेतकर्‍यांवर कारवाईचा मुद्दा खुद्द भुसे यांनी मांडला. थकबाकी वसूलीसाठी शेतकर्‍यांच्या दाराशी लिलाव बोलविता. लिलावात बँकेचेच कर्मचारी नातेवाईकांमार्फत ट्रॅक्टर व जमीनी खरेदी करत असल्याचा थेट आरोप भुसे यांनी केला. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत बँकेला अनुदान उपलब्ध करून दिले. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत बँकेला ९२० कोटी रूपये दिले असताना नियमित कर्जफेड करणार्‍या ३० ते ३५ टक्के शेतकर्‍यांना त्याच लाभ मिळाला. बाकीच्या पैश्यांची तुम्ही वाट लावली, अशा शब्दांत भुसे यांनी बँकेच्या अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. आमदार माणिकराव कोकाटे यांनी सभासदांचा बँकेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामूळे बँकेचा कारभार राज्य शिखर बँकेकडे देताना १ हजार कोेटी रूपयांची तरतू करण्याती मागणी केली. बैठकीत एका सदस्याने १ कोटींचे तारणावर एका नेत्याला १६ कोटींचे कर्ज दिले.

- Advertisement -

तसेच या कर्जाची वसूलीसाठी अधिकारी धजावत नसल्याचा आरोप केला. त्यावर बँकेचे अधिकार्‍यांनी २०१६ पूर्वीच्या ५ लाखांवरील थकबाकीदार असलेल्या १०० जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकरी ६ जणांनी पूर्णपणे थकबाकीची रक्कम भरल्याचे सांगितले. मात्र, उर्वरित ९४ थकबाकीदारांचे काय केले असता प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. जिल्हा बँकेला डबघाईत आणणार्‍या १०० थकबाकीदारांवर कारवाई करतानाच बँकेची एसआयटी चौकशीची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. त्यावर भुसे यांनी कारभारात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी तंबीच अधिकार्‍यांना दिली.

प्रशासकांना नोटीस काढा : भुसे

जिल्हा बँकेच्या प्रशासकांना प्रशासनाने जिल्हा नियोजन बैठकीचे सूचना देण्यात आली होती. परंतु, घरगुती कारणास्तव प्रशासक हे औरंगाबादला गेल्याची माहिती बँकेच्या कनिष्ठ अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. चार दिवसांपुर्वी सूचना देऊनही बैठकीस गैरहजर असणार्‍या प्रशासकांना नोटीस बजावण्याचे आदेश ना. भुसे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -