घरमहाराष्ट्रनाशिकटिप्पर गँगच्या दोन सदस्यांवर हद्दपारीची कारवाई

टिप्पर गँगच्या दोन सदस्यांवर हद्दपारीची कारवाई

Subscribe

सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या टिप्पर गँगच्या दोन सदस्यांवर पोलिसांनी थेट हद्दपारी व स्थानबद्धतेची केली कारवाई

गुन्हेगारी कृत्ये करत सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या टिप्पर गँगच्या दोन सदस्यांवर पोलिसांनी थेट हद्दपारी व स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या दोघांचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. तसेच, अद्यापही त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरू असल्याने पोलिसांनी हद्दपारीचे पाऊल उचलले.

टिप्पर गँगमधील सराईत गुंड समीर उर्फ छोटा पठाण नासीर पठाण (रा. शिवपुरी चौक, सिडको) आणि नागेश सोनवणे (रा. रिंकी संकुलाजवळ, उपेंद्रनगर, सिडको) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -