घरताज्या घडामोडीकोरोनाचा धसका : नामपूर रुग्णालय सील, डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोनाचा धसका : नामपूर रुग्णालय सील, डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Subscribe

बागलाण तालुक्यातील नामपूर ग्रामीण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी (दि. १४) उशिरा पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टर मालेगावमधील रहिवाशी असून त्यांच्या संपर्कात आलेल्या बागलाण तालुक्यातील रुग्ण व इतर व्यक्तींचा प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नामपूर रुग्णालय सील करण्यात आले आहे. या रुग्णालयात आलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे यांनी केले आहे.

नामपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथील मोमीनपुरा येथे वास्तव्यास आहेत. तेथून येऊन जाऊन ते रुग्णालयाचा कार्यभार पाहत आहेत. मालेगावातील वास्तव्याच्या परिसरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पत्नीसह त्यांना रविवारी (दि.१२) क्वारंटाईन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार तालुक्यातील प्रशासनास माहिती देण्यात आली. प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलिस अधिकारी शिवचरण पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव आदींनी तत्काळ कार्यवाहीस प्रारंभ केला.

- Advertisement -

अफवांवर विश्वास ठेवू नये

संबंधित डॉक्टरांनी क्वारंटाईन होण्यापूर्वी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी केली आहे. तसेच ते आणखी काही जणांच्या संपर्कात आलेे आहेेेत. त्यानुसार प्रशासनाकडून संबंधितांचा शोध घेण्यात येेत आहे. संबंधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची मालेगाव येथे वैद्यकीय तपासणी होणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरांना तालुक्यातून कोरोनाची लागण झालेली नसून त्यांच्यामुळे कुणाला लागण झाली आहे का? हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे तालुकावासियांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -