घरमहाराष्ट्रनाशिकनिवडणूक शाखेकडून राजकिय पक्षांना मतदार याद्या वाटप

निवडणूक शाखेकडून राजकिय पक्षांना मतदार याद्या वाटप

Subscribe

मतदार यादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी करण्यास राजकीय पक्षांना संधी न देण्याचा निवडणूक शाखेचा पवित्रा

राजकिय पक्षांना मतदार याद्या उपलब्ध करून देणे ही निवडणूक शाखेची जबाबदारी आहे त्यानूसार निवडणूक शाखेकडून थेट राजकिय पक्षांच्या कार्यालयातच मतदार याद्या पोहचविण्यात आल्या. त्यामुळे आता मतदार यादीत त्रुटी राहील्या अशी तक्रार करण्यास राजकिय पक्षांना एकही संधी न देण्याचा निवडणूक शाखेचा पवित्रा दिसून येतो.

निवडणूकीनंतर मतदार यादीत त्रुटींबाबत निवडणूक विभागावर ताशेरे ओढले जातात. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुक होणार हे गृहित धरून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. एकीकडे मतदारांच्या जनजागृतीवर भर दिला जात असतानाच निवडणुकीसाठी आवश्यक सामग्री आतापासूनच उपलब्ध होईल याची खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून घेण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सात राष्ट्रीय आणि दोन राज्यस्तरीय राजकीय पक्षांना मतदारयादीची प्रत देणे ही निवडणूक शाखेची जबाबदारी आहे.

- Advertisement -

मतदारयादी घेऊन जाण्याचे आवाहन निवडणूक शाखेकडून वारंवार केले जाते. परंतु, या आवाहनाला राजकीय पक्षांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याचा निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचार्‍यांचा पूर्वानुभव आहे. राजकीय पक्षांना निवडणुकीच्या धामधुमीत असे रडगाणे गाण्याची संधीच मिळू नये याकरिता त्यांच्या कार्यलयापर्यंत याद्या पोहोच करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. भाजप, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह महत्त्वाच्या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांपर्यंत या याद्या पोहोच करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -