घरमहाराष्ट्रनाशिककामगार कायदा लागू न केल्याने कर्मचारी संपावर

कामगार कायदा लागू न केल्याने कर्मचारी संपावर

Subscribe

एक वर्ष लोदुनही मसुदा कंपनी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील वीर ईलेक्ट्रो प्रा. लि. कंपनीतील कर्मचार्‍यांना कामगार कायद्याच्या कोणत्याही सुविधा लागू न केल्याने कामगारांनी शुक्रवार (दि. २०) पासून संपावर जाण्याचा निर्णय घेत बेमुदत संप पुकारला आहे. या कंपनीत नाशिक वर्कर्स युनियन असून युनियनचे नाशिक जिल्हा सरचिटणीस संतोष काकडे यांनी या कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीच्या करारा संदर्भातील सर्वसाधारण मागण्यांचा मसुदा कंपनी व्यवस्थापनास मागील वर्षी दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी ओडी पोस्टाने सादर केला होता.

मात्र सदर मसुद्यावर चर्चा होऊन वेतन वाढीचा करार होणेकामी आजपावेतो कंपनी व्यवस्थापनाने करारा संदर्भात चर्चेसाठी युनियनला बोलावले नाही. मागणी पत्रावर चर्चा होऊ न शकल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असल्याने त्वरित चर्चा होऊन पगारवाढ झाली पाहिजे, कामगार उपायुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व युनियन यांच्यात चर्चा होऊन पीएफ, ईएसआयसी, स्पेशल अलाऊन्स देण्याचे मान्य केले होते. परंतु अद्यापही व्हीडीए लागू केला नसून तो त्वरित लागू करावा, युनियन कामगारांमध्ये भेदभाव करून कामाच्या जागेत बदल करावा, काही कामगारांना कामावरून कमी केले आहे त्या कामगारांना कामावर घ्यावे आदी मागण्यांसाठी पहिल्या शिफ्टपासून कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे.

- Advertisement -

याप्रसंगी सीआयटूचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सोमजे, तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, किसानसभा तालुकाध्यक्ष चंद लाखे, सरपंच ज्ञानेश्वर उगले, उपसरपंच ज्ञानेश्वर तोकडे, सरचिटणीस विजय नाठे, गोदेंचे सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ नाठे, निलेश नाठे, सुनिल नाठे, परशुराम नाठे, यांच्यासह इम्फिलुम इंडियाचे विठोबा कातोरे, भाऊसाहेब जाधव, अशोक कदम, शरद बोराडे, मनोज भोर, नितीन गवते यांच्यासह कामगार व महिला कामगार आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -