घर उत्तर महाराष्ट्र अखेर, पिंगळे झाले सभापती; नाशिक बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अखेर, पिंगळे झाले सभापती; नाशिक बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह राज्याच लक्ष लागलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक शनिवारी (दि. २७) पार पडली. अनेक चढ-उतार व घडामोडी नंतर अखेर महाविकास आघाडीच्या  माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले. बाजार समिती मुख्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत देविदास पिंगळे यांची सभापती पदी तर उत्तम खांडबहाले यांची उपसभापती पदी निवड झाली. चुंबळे गटाने ऐन वेळी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

खरतर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून ते संचालक आपत्रते बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. आरोप-प्रत्यारोप, आमदारांना धमकी, पैशांचा वापर, मतदारांसाठी केलेली बाई आणि बाटलीची सोय अशा अनेक वादांमुळे निवडणूक रंगतदार व वादग्रस्त ठरली होती. निकालानंतर चार संचालकांच्या आपत्रतेचा विषय थेट मुख्यमंत्री आणि त्यानंतर उच्च न्यायालया पर्यंत जाऊन पोहचला होता. इतक्या सगळ्या घडामोडी नंतर अखेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यात देविदास पिंगळे गटाने आपली सत्ता बाजार समितीवर स्थापित केली.

- Advertisement -

दरम्यान,  संचालक फुटीच्या भितीतून देविदास पिंगळे व शिवाजी चुंभळे दोन्ही गटांनी आपल्या समर्थक संचालकांना गेल्या काही दिवसांपासून अज्ञातस्थळी रवाना केले होते. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हे संचालक थेट शनिवारी सकाळी नाशिक मध्ये प्रकट झाले. वादग्रस्त व तणावपूर्ण राहिलेल्या बाजार समितीच्या एकूण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती व उपसभापती निवडणुकीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने बाजार समितीच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

गेल्या तीस वर्षांपासून बाजार समितीवर मतदार आम्हाला निवडून देत आले आहे. यंदाची निवडणूकीत खूप वेगवेगळे अनुभव आले. यात विरोधकांकडून करण्यात आलेल्या अपीलांवर न्यायालयीन लढाई लढत न्यायदेवतेने आमच्या बाजूने निकाल दिला. : देविदास पिंगळे, नवनिर्वाचितसभापती, नाशिक कृ..बा.

बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी व सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी विरोधक म्हणून आम्ही पार पाडू. शेतकरी, मापारी आणि व्यापारी यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. : शिवाजी चुंभळे,माजी सभापती तथा संचालक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -