घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोरी क्षमेना; पोलीस निरीक्षक, पोलीस नाईक यांच्यासह एकजण जाळ्यात

लाचखोरी क्षमेना; पोलीस निरीक्षक, पोलीस नाईक यांच्यासह एकजण जाळ्यात

Subscribe

मालेगाव : नाशिक ग्रामीण हद्दीतील मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांसह आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल आहे. अवैध धंदे चालवणार्‍या व्यक्तिसह त्याच्या साथीदारांवर कारवाई न करण्याच्या बदल्यात वीस हजार रुपयांची मागणी केल्याच्या माहितीच्या आधारे मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार ताराचंद घुसर, पोलीस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील आणि सय्यद रशीद सय्यद रफिक उर्फ रशीद बाटा यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून शनिवारी (दी.१) ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या महितीनुसार, तक्रारदार असलेल्या व्यक्तीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र दि. ३ सप्टेबर रोजी जेवण करुन घरी परतत असताना मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी त्यांना ‘एमडी’ नामक नशेच्या पदार्थांशी संबधित असल्याच्या संशयवरून ताब्यात घेत त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात चौकशीला करिता घेऊन गेले. दरम्यान चौकशीअंती कोणतीही कायदेशीर कारवार्ई न करण्याच्या मोहबदल्यात तक्रारदार व त्याच्या भावाकडे संशयित पोलीस कर्मचार्‍यांनी तब्बल एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर या रकमेबाबत तडजोड करत ५० हजारांची मागणी करण्यात आली, आणि शेवटी २० हजारावर तडजोड करण्यात आली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचत मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशचंद ताराचंद घुसर, पोलीस नाईक आत्माराम पाटील यांच्यासह सय्यद रशीद सय्यद रफिक उर्फ रशीद बाटा यांना रंगेहात ताब्यात घेतले.

- Advertisement -

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, संजय ठाकरे,  नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -