घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात महिला डॉक्टरसह परिचारिकेला अटक

अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात महिला डॉक्टरसह परिचारिकेला अटक

Subscribe

सटाणा : येथील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन गर्भवती मुलीस दाखल करून गुपचूप बेकायदेशीरपणे तिचा गर्भपात केल्याप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचिता बच्छाव व अधिपरिचारिका कामिनी आत्माराम कोर यांन अखेर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांची रवानगी नाशिक येथील जिल्हा कारागृहात कटण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या पत्रावरून सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, बहुचर्चित असलेल्या बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी अखेर डॉक्टर व परिचरिकेस अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका खेडेगावातील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी १६ आठवडे व दोन दिवसांची गर्भवती असल्याने १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता तिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अधिपरिचारिका कामिनी कोर ही ड्युटीवर होती. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर त्यावेळी उपस्थित नसल्याने अधिपरिचारिकेने फोनवरून त्यांच्याशी संपर्क करून या मुलीवर’ काय औषध उपचार करायचे याची माहिती घेऊन उपचार केले होते. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास परिचारिका कामिनी कोर हिने पोलिसांना माहिती न देता अल्पवयीन गर्भवती मुलीचा गर्भपात केला. दरम्यान, यावेळी रात्रीच्या कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी चार महिन्यांचे गर्भपातासाठी वापरलेल्या गोळ्या व साहित्य जप्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत या गर्भवतीवर अत्याचार करणार्‍या कोळीपाडा येथील एका विवाहित तरुणास अटकही केली होती. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचिता बच्छाव, अधिपरिचारीका कामिनी कोर यांना निलंबित केले होते. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस करीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -