दरोडा टाकण्यापुर्वीच चार दरोडेखोर जेरबंद

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अंबड पोलिसांनी महालक्ष्मीनगर, अंबड येथून गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुसे, सुरा, स्क्रु ड्रायव्हर, कटावणी, नायलॉन दोरीसह अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि.३१) मध्यरात्री घडली. यातील एकजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. पोलिसांना चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रियासतअली मन्सुरी (२७, सर्वजण रा.शिवाला कला, ता.चाँदपूर, जि.बिजनोर, उत्तरप्रदेश), सिकंदखान छोटू खान पठाण (४०), मोहमंद अरबाज रफिक अहमद शेख (२१), मोहमंद अजहर सर्फराज शेख (१९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

arrest

पोलिसांच्या माहितीनुसार, चारजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुसे, सुरा, स्क्रु ड्रायव्हर, कटावणी, नायलॉन दोरी अशी प्राणघातक व घरफोडीची हत्यारे बाळगुण असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरोड्याची तयारी करीत असताना पोलिसांनी चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. अंधाराचा फायदा घेत सलमान शेख फरार झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल पांडुरंग दिघोळे यांनी अंबड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पालकर करत आहेत.