घरमहाराष्ट्रनाशिकवयोवृद्धाची फसवणूक : साडूच्या मुलाने ‘फोन पे’वरुन घातला सव्वालाखांना गंडा

वयोवृद्धाची फसवणूक : साडूच्या मुलाने ‘फोन पे’वरुन घातला सव्वालाखांना गंडा

Subscribe

रामवाडीतील घटना, पंचवटी पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल

नाशिक:  रामवाडी येथील वयोवृद्धाला साडूच्या मुलाने मोबाईचा वापर करून ‘फोन पे’व्दारे सव्वालाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन बाबुलाल तांबट (६८, रा. नंदविहार सोसायटी, रामवाडी, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय केशव कासार (रा. हुडको कॉलनी, भुसावळ, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अक्षय कासार हा तांबट यांच्या साडूचा मुलगा आहे. संशयित अक्षय याने २ जुलै २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतन तांबट यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला. त्याने त्यांच्या वयोवृद्धपणाचा गैरफायदा घेतला. मित्राला फोन करायचा असे सांगून त्याने तांबट यांचा मोबाईल घेतला .

- Advertisement -

 संशयित अक्षय याने यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या फोन पे या अ‍ॅपवरून तांबट यांच्या एसबीआय बँक खात्यावरून त्याचा मित्र मिलिंद गौतम सोनवणे याच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर सुमारे १ लाख २५ हजार रुपये टप्पाटप्प्याने पाठविले. हा प्रकार तीन महिनानंतर तांबट लक्षात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पडोळकर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -