घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवर्चस्व वादातून दोन गटांत 'गॅंग वार'; शहरातील गुन्हेगारी थांबेना

वर्चस्व वादातून दोन गटांत ‘गॅंग वार’; शहरातील गुन्हेगारी थांबेना

Subscribe

नाशिक : वर्चस्ववादातून बजरंग वाडी येथील महादेव मंदिराजवळ दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (दि.१५) रात्री घडली. या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. दगडफेकीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक बाळू गिते यांच्या फिर्यादीनुसार, बजरंगवाडी परिसरात बुधवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. परिसरातील वर्चस्ववादातून संशयित मंगेश हिरामण जाधव व संकेत उर्फ दाद्या तोरवणे यांच्यात वाद सुरु होते. मंगेश जाधव यास संकेत तोरवणे, चेतन जाधव, अभिषेक ब्राह्मणे, रोहन उर्फ मोनू शर्मा व त्यांच्या साथिदारांनी मारहाण केल्याने मंगेशला गंभीर दुखापत झाली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीला पांगवण्यास सुरुवात केल्यानंतर दोन्ही गटातील संशयितांनी एकमेकांवर दगडफेक करीत मारहाण केली. यात विशाल सोमनाथ गाढवे हा जखमी झाला. विशालच्या डोक्यात संशयित संकेतने कोयत्याने वार करूनजीवे मारण्याचा प्रयत्न केला. मंगेश व विशालवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जमावाच्या दगडफेकीत स्थानिकांच्या घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी जमाव पांगवत संशयितांची धरपकड केली. यात संकेत तोरवणे गटातील १४ तर मंगेश जाधव गटातील १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -