घरमहाराष्ट्रनाशिकपार्टीला जा, मात्र या वेळेत परत येऊ नका

पार्टीला जा, मात्र या वेळेत परत येऊ नका

Subscribe

शहरात रात्री ११ ते ६ वाजेपर्यंत राहणार कडक नाईट कर्फ्यू, सार्वजनिक ठिकाणे, टेरेसवर पार्ट्यांना बंदी

नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आतूर झालेल्या पार्टीप्रेमींना थर्टी फर्स्टला चांगलीच काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, कोरोनामुळे गुरुवारी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लागू असल्याने, रात्री पार्टीला जात असाल तर परत मात्र, कर्फ्यू संपल्यावरच या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस सतर्क झाले असून, ३ हजार पोलीस ३० ठिकाणी नाकाबंदी करणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे यंदा सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषावर मर्यादा येणार आहे. नाईट कर्फ्यू काळात पोलिसांकडून शहरात ३० ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आढळून आल्यास त्यांच्यावर संचारबंदी कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शासनाने २३ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर अनेकांच्या विरजण पडणार आहे. नवीन वर्षात सेलिब्रेशन करायचे ठरले तरी पाच जानेवारीपर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत.

- Advertisement -

थर्टी फर्स्टच्या पार्टीचे हॉटेल, रिसॉर्ट, कल्ब आणि लॉन्समध्ये आयोजन केले जाते. यंदा रात्री ११ वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने चोरून-लपून पार्टीचे आयोजन करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणे व सोसायट्यांच्या टेरेसवर पार्ट्या करताना कोणी दिसून आल्यास नागरिकांनी १००, 0253-5233 या क्रमांकावर किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. नागरिकांना वेळेत संपर्क करता यावा, यासाठी कंट्रोल रुममध्ये पोलिसांच्या तीन टीम कार्यरत राहणार आहेत.

यावर असेल बंदी

फटाक्यांची आतिषबाजी, साऊड सिस्टीम.

- Advertisement -

बंदी असलेली ठिकाणे

रस्ते, सोसायटी टेरेस, मोकळे मैदान, उद्याने, हॉटेल, लॉन्स, सार्वजनिक ठिकाणे.

या ठिकाणी करता येईल पार्टी

फ्लॅट किंवा बंगल्यामध्ये ४ ते ५ लोक एकत्रित लोक पार्टी करु शकतात. मात्र, त्यावेळी साऊंड सिस्टीम, फटाक्यांची आतिषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये रात्रपाळीवर आलेल्या कर्मचार्‍यांना ये-जा करण्यास पोलिसांकडून मनाई केली जाणार नाही.

शहराबाहेर जावून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पार्ट्यांचे काहीजणांनी नियोजन केले असेल तर त्यांनी नाईट कर्फ्यू संपल्यानंतर परत यावे. कर्फ्यू काळात सर्व आस्थापना ११ वाजेनंतर बंद राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी रस्ते, मोकळे मैदानावर साजरा करु नये. साऊड सिस्टीम व फटक्यांची आतिषबाजी करु नये. सोसायट्यांच्या टेरेसवर साजरा करु नये. पोलिसांकडून मद्यपींवर कडक कारवाई केली जाणार आहे. – संग्रामसिंह निशाणदार, पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -