घरताज्या घडामोडी"उद्धव साहेबांना मालेगावतील सभेसाठी शुभेच्छा" : पालकमंत्री दादा भुसे

“उद्धव साहेबांना मालेगावतील सभेसाठी शुभेच्छा” : पालकमंत्री दादा भुसे

Subscribe

नाशिक : भाजपचे नेते अद्वय हीरे यांनी शुक्रवारी (दी.२७) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन याठिकाणी ठाकरे गटात प्रवेश केला. हीरे यांच्या रूपाने नाशिकचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे वरिष्ठ नेते दादा भुसे यांची त्यांच्या होमपिच वरच कोंडी करण्याची खेळी ठाकरे गटकडून खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हीरे यांच्या प्रवेश सोहळ्या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी थेट मालेगाव मध्ये सभा घेण्याच जाहीर केलय. याबाबत बोलताना भुसे यांनी ‘मालेगाव मधील सभेसाठी उद्धव साहेबांना शुभेच्छा आहेत’ असे म्हणत. विषय टाळत या विषयाला किती महत्व द्यायचे हे त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

पुढील २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या आढावा घेण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी अद्वय हीरे यांनी केलेल्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत तसेच उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्त आणि मालेगाव मध्ये सभा घेण्याची केलेली घोषणा याबाबत बोलताना भुसे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना मालेगावत सभा घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

दादा भुसे पुढे म्हणाले, लोकशाही प्रक्रिये मध्ये सभा घेणे, आपले मत व्यक्त करणे, कोणी कोणत्या पक्षात जाणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच उद्धव साहेबांना देखील मागेगावच्या सभेसाठी शुभेच्छा देतो असे बोलतानाच माझ्यासारखा कार्यकर्ता, सामान्य शिवसैनिक हा निवडणुकी पुरता काम करत नाही, बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यानुसार विकासकामे, सुख दुख आदि बाबतीत कार्यकर्ता म्हणून मी नेहमी काम करत असतो. निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात. निवडणुकांसाठी मी काम करत नाही. असेही भुसे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -