घरमहाराष्ट्रनाशिकचिंताजनक; भूजल पातळी खालावण्यात नाशिक नंबर एकवर

चिंताजनक; भूजल पातळी खालावण्यात नाशिक नंबर एकवर

Subscribe

चिंताजनक बाब अहवालातून पुढे, राज्याच्या यादीत दुष्काळी मराठवाड्याचा समावेशही नाही

पाण्याची सर्वाधिक भ्रांत असलेला मराठवाडा भूजल सर्वेक्षणातील धोकेदायक जिल्ह्यांच्या यादीत नसला तरी मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्ह्याचा या यादीत समावेश झाला आहे. भूजल पातळी खालावण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल असल्याची चिंताजनक बाब नुकतीच यासंदर्भातील अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे आगामी काळात भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज भासणार आहे.

जुलै महिन्याचा मध्य आला तरीही अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पाण्याच्या बाबतीत नाशिकवर अवलंबून असलेल्या मराठवाड्याचेही नाशिककडेच लक्ष लागून आहे. मात्र, भूजल पातळीच्या अहवालाने अनेकांची झोप उडाली आहे. या अहवालासंदर्भातील माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महासभेत दिली. त्यांनी सांगितले, महाराष्ट्रात भूजल पातळी खालवण्यात नाशिकचा पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे आता स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

पाच वर्षातील नीचांकी नोंद

यंदा पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत नीचांकी भूजल पातळीची नोंद झाली आहे. सिन्नर, सटाणा, मालेगाव या तीन तालुक्यांतील भूजल पातळी सुमारे तीन मीटरपर्यंत खोल गेल्याने हे तालुके ‘डेंजर झोन’च्या कक्षेत आले आहेत. शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. ती मोजण्यासाठी जिल्ह्यातील 185 विहिरी निश्चित करण्यात आल्या असून त्यानुसार गेल्या महिन्यात दिंडोरीत (10), नाशिकमध्ये (9), इगतपुरीत (10), निफाडला (20), सिन्नरला (18), येवला (13), नांदगाव (23), सटाणा (18), चांदवड (6), मालेगाव (22), कळवण (6), देवळा (7), त्र्यंबकेश्वर (12), पेठ (4), सुरगाणा (7) येथील विहिरींच्या जलपातळीचे सर्वेक्षण करण्यात आलेे. त्यातून गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. सिन्नर (-2.41), मालेगाव (-2.37) व सटाणा (-2.17) या तीन तालुक्यांची भूजल पातळी अडीच मीटरने कमी झाली आहे. तीन मीटरपेक्षा पाणी पातळी कमी झाल्यास संबंधित तालुक्याचा समावेश ‘डेंजर झोन’मध्ये केला जातो.

भूजल पातळी खालावण्याची प्रमुख कारणे

  • अपुरा पाऊस जमिनीतून मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा उपसा
  • बोअरचे वाढते प्रमाण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अमलबजावणीत कसर
  • नैसर्गिक स्त्रोतांवर होणारे अतिक्रमण आणि बांधकामे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -