घरमहाराष्ट्रनाशिक‘हंडाभर चांदण्या’ बीए अभ्यासक्रमात

‘हंडाभर चांदण्या’ बीए अभ्यासक्रमात

Subscribe

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

दुष्काळग्रस्त गावांची व्यथा मार्मिक आणि संवेदनशील पद्धतीने मांडणारे ‘हंडाभर चांदण्या’ हे प्रायोगिक नाटक आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. बीए प्रथम वर्षाच्या दुसर्‍या सत्रातील ‘मराठी साहित्य : एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास’ या घटकांतर्गत ‘पु. ल. देशपांडे लिखित ‘विठ्ठल तो आला आला’ आणि दत्ता पाटील लिखित ‘हंडाभर चांदण्या’ हे दोन एकांकीकांचा समावेश केला आहे. नाशिक रंगभूमीचा नावलौकिक वाढवणारी ही गौरवास्पद बाब आहे.

महाराष्ट्राच्या प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले ‘हंडाभर चांदण्या’ या प्रायोगिक नाटकाने रंगभूमीला एक नवे वळण दिले. सध्याचा पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न या नाटकातून अतीशय वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगिताच्या प्रभावी माध्यमातून सद्यस्थितीवर उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रमोद गायकवाड हे निर्माते असून, प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, राहूल गायकवाड, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. प्रयोगमूल्यासोबतच साहित्यमूल्यही ठासून भरलेल्या या समकालीन नाटकाची संहिता प्रथम वर्ष बीए अभ्यासक्रमासाठी निवडली गेल्याने नाट्यवर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -