घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुख्याध्यापिकेची गळफास घेत आत्महत्या

मुख्याध्यापिकेची गळफास घेत आत्महत्या

Subscribe

राहत्या घरी मुख्याध्यापिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. निलम प्रभाकर बागूल (वय 54, रा. विश्वजित बंगला, गोकुळ नगर, बोराडे मळा, मखमलाबाद) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम बागूल या सोमवारी (दि.२७) सकाळी 10.30 वाजता बेडरूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. बागूल या इगतपुरी येथील जनता महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांचा चालक सोमवारी घरी आला. त्याने घराचा दरवाजा वाजविला मात्र, आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी चालकाने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्यास बागूल या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यानंतर चालकाने बागूल यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी म्हसरूळ पोलिसांना बागूल यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वर्षांपूर्वी बागूल यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या मखमलाबादमध्ये एकट्याचा राहत होत्या. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत.

मुख्याध्यापिका निलिमा बागूल घरी एकट्याच राहत होत्या. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून, पोलिसांना सुसाईट नोट आढळून आली नाही. यासंदर्भात पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार केलेली नाही. त्यांनी आत्महत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत.
– राजू पाचोरकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -