घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकला पुन्हा यलो अलर्ट ; रविवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिकला पुन्हा यलो अलर्ट ; रविवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

Subscribe

हवामान खात्याने वर्तवला अंदाज, पावसाच्या शक्यतेने अतिवृष्टीग्रस्त भागांनी घेतला धसका

सप्टेंबरच्या प्रारंभीच राज्यभरात दमदार बरसलेल्या पावसाने नाशिकमध्येही चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यात उघडीप दिलीय. दरम्यान आता हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिकसह नंदुरबार, धुळे आणि जळगाव या चार जिल्ह्यांना रविवारपासून मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिलाय. राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी उत्तर महाराष्ट्रासह भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -